31 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरक्राईमनामापाकमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ची केंद्रे सोयीसुविधांनी सुसज्ज; फ्रेंच मॅगझिनमध्ये धक्कादायक खुलासे

पाकमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ची केंद्रे सोयीसुविधांनी सुसज्ज; फ्रेंच मॅगझिनमध्ये धक्कादायक खुलासे

फ्रेंच मॅगझिन ‘ले स्पेक्टेकल डू मोंडे’मधील अहवालातून चित्र स्पष्ट

Google News Follow

Related

फ्रेंच मॅगझिन ‘ले स्पेक्टेकल डू मोंडे’मधील तपशीलवार चौकशी अहवालात पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांच्यातील चिंताजनक संबंध उघड केले आहेत. फ्रेंच मासिकाच्या २०२४ च्या हिवाळी आवृत्तीमध्ये प्रकाशित झालेला ‘जैश-ए-मोहम्मद, ट्रबल गेम्स इन पाकिस्तान’ या शीर्षकाचा लेख मुख्य संपादक अँटोइन कोलोना यांनी लिहिला आहे. यातून उघड केले आहे की, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वचनबद्धता असूनही अतिरेकी गटांना आश्रय देणे आणि त्यांचे समर्थन करण्यात पाकिस्तानची भूमिका आहे.

अहवालात, जैश ए मोहम्मदच्या पुनरुत्थानावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः पंजाब प्रांतातील बहावलपूर भागात जिथे हा गट ‘मरकझ सुभान अल्ला’ सारखे मोठे कॉम्प्लेक्स चालवतो. वसतिगृहे, धार्मिक शिक्षण केंद्रे आणि अगदी सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्वयंपूर्ण यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या या सुविधा दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून काम करतात.

हे ही वाचा..

उपमुख्यमंत्री शिंदे यांची दीक्षाभूमीला भेट

निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणींमध्ये वाढ; खटला चालवण्यास नायब राज्यपालांची मंजुरी

रशियातील कझान शहरात ड्रोन हल्ला; तीन इमारतींना केले लक्ष्य

संजय राऊत यांची रेकी करणारे निघाले, मोबाईल कंपनीचे कर्मचारी!

नियतकालिकाच्या अहवालानुसार, उपग्रह प्रतिमा आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून असे दिसून आले आहे की हा सर्व कारभार खुलेपणाने केला जातो. यातील एक कॉम्प्लेक्स पाकिस्तान लष्करी तळापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे. प्लॅनेट लॅब्सच्या वेबसाइटवर उपलब्ध उपग्रह फोटोंनुसार, बहावलपूर भागात जैश-ए-मोहम्मदची दोन केंद्रे आहेत. ‘मरकझ सुभान अल्ला’ आणि ‘उस्मान-ओ-अली मस्जिद’. पहिले कॉम्प्लेक्स हे ६० हजार चौरस मीटर परिसरात विस्तारलेलं आहे. त्यात कुराण अभ्यासाचे केंद्र, क्रीडा हॉल, वसतिगृहे आणि सुमारे पन्नास खोल्यांचा समावेश आहे. मसूद अझहरचा पुतण्या, मुहम्मद अताउल्ला काशिफ हा मरकझचा प्रशासकीय प्रमुख आहे. हे केंद्र सुमारे ६०० ते ७०० सदस्यांना अतिरेकी धार्मिक शिक्षण तसेच शारीरिक प्रशिक्षण देते. त्यात ४० ते ५० शिक्षक देखील आहेत, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा