24 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषजयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू!

जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू!

४१ जण जखमी

Google News Follow

Related

जयपूर-अजमेर महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी ५:३० वाजता एक सीएनजीने भरलेला टँकर दुसर्‍या ट्रकावर आदळला. यानंतर मोठा स्फोट झाला आणि टँकरला भीषण आग लागली. या भीषण स्फोटामुळे अनेक गाड्यांना आग लागली. दुर्घटनेत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४१ जण जखमी झाले.

पोलिसांनी सांगितले की, आग लवकरच शहरातील भांक्रोटा भागातील इंधन पंपापर्यंत पसरली. या आगीत इंधन केंद्रावर उभी असलेली अनेक वाहनेही जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी जखमींना जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हे ही वाचा: 

‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून गरळ ओकत देशमुख कुटुंबाला मारहाण; प्रकरण काय?

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य

या भीषण आगीने मार्गावरील जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला देखील आपल्या जाळ्यात ओढले. ट्रॅव्हल्सला आग लागताच प्रवाशांनी काचा तोडल्या आणि बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला. तर काही प्रवासी या आगीत होरपळले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सवाई मानसिंग हॉस्पिटलला भेट दिली आणि अधिकाऱ्यांना जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले.

जयपूरचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) जितेंद्र सोनी यांनी सांगितले की, या घटनेत ४१ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे सुमारे ४० गाड्यांना आग लागली. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली आहे आणि फक्त एक ते दोन गाड्या उरल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा