25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरविशेषसीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

संसदेतील अहवालात अपघाताचे कारण स्पष्ट

Google News Follow

Related

भारताचे पहिले देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर रोजी २०२१ रोजी हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. . या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. या अपघाताचे कारण आता तीन वर्षांनी समोर आले आहे. संसदेत रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा रिपोर्ट सादर करण्यात आला. यानुसार मानवी चुकांमुळे ही हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तामिळनाडूतील कुन्नूरजवळ लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर अनेक सशस्त्र दलातील जवानांचा मृत्यू झाला होता. ८ डिसेंबर २०२१ मध्ये एमआय १७ व्ही ५ या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या अपघाताची प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

मंगळवारी संसदेत सादर केलेल्या अहवालात, संरक्षणविषयक स्थायी समितीने १३ व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातांच्या संख्येची आकडेवारी सामायिक केली. २०२१- २२ मध्ये झालेल्या नऊ IAF विमान अपघात आणि २०१८- १९ मध्ये ११ अपघातांसह एकूण ३४ अपघात झाले. या अहवालात ३३ वी दुर्घटना ही रावत यांच्या हेलिकॉप्टरची आहे. याचे नाव एमआय १७ असे देण्यात आले असून तारीख रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची आहे. यामध्ये मानवी चूक (एअर क्रू) असे नोंदविण्यात आले आहे. या सर्व अपघातांची चौकशी पूर्ण करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा : 

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य

राहुल गांधींवर शारीरिक इजा पोहोचवल्याचा आरोप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

भारतीय वायुसेनेचे Mi- 17 V5 हे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावरून वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे जाण्यात निघाले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर १२ सशस्त्र दलाचे कर्मचारी यात होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच संपर्क तुटून हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा