25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरक्राईमनामाराहुल गांधींवर शारीरिक इजा पोहोचवल्याचा आरोप

राहुल गांधींवर शारीरिक इजा पोहोचवल्याचा आरोप

धक्काबुकीत भाजपचे खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप सारंगी जखमी

Google News Follow

Related

हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या धक्काबुकीत भाजपचे खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप सारंगी हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केला असून राहुल गांधी यांनी धक्काबुकी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत.

माहितीनुसार, भाजप खासदार हेमांग जोशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. संसदेच्या आवारात झालेल्या हाणामारीत तक्रारकर्त्याने राहुल गांधींवर शारीरिक हल्ला केल्याचा आणि चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे. कलम ११५ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), ११७ (स्वैच्छिकपणे गंभीर दुखापत करणे), १२५ (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणण्याचे कृत्य), १३१ (गुन्हेगारी शक्तीचा वापर), ३५१ (गुन्हेगारी धमकावणे) आणि ३ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संसदेत आणि संसद बाहेर निदर्शन करणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केली आहे. शिवाय कोणत्याही खासदाराला अडवणूक करता येणार नसल्याचा आदेशही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला आहे.

हे ही वाचा :

विराट-अनुष्का स्थायिक होणार लंडनमध्ये

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा

एकनाथ शिंदेंचे नमस्ते सदा वत्सले… घरगड्याला वांत्या..

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांकडून बुधवारी आणि गुरुवारी संसदेबाहेर निदर्शने झाली. याला भाजपने प्रत्युत्तर दिले. याचं दरम्यान झालेल्या गोंधळात गुरुवारी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धक्काबुकी झाली आणि काही खासदार जखमी झाल्याचा आरोप केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा