उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हाता नगरपालिकेत अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मदनी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. मशिदीच्या अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मशिदीच्या जागेचे मोजमाप सुरू केले आहे. हिंदुत्ववादी नेते आणि तक्रारदार राम बच्चन सिंह यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
तक्रारदार राम बच्चन सिंह यांनी सांगितले की, पोलीस चौकी आणि नगरपालिकेच्या जागेवर बेकायदा अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली आहे. येथे मुस्लिम पक्षाचे म्हणणे आहे की, आम्ही मशिदीच्या बांधकामासाठी ३२ दशांश जमीन (१०० दशांश म्हणजे एक एकर) खरेदी केली आहे. केवळ ३० दशांश वर बांधकाम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम पक्षाने जमिनीच्या कागदपत्रांसह जिल्हा प्रशासनासमोर आपली बाजू मांडली आहे. मोजमाप करताना शहरात शांतता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन कार्यक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलिस ठाण्यांतून फौजफाटा तैनात केला आहे.
हे ही वाचा :
शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!
“संघाशी नातं लहानपणापासूनचं; संघाच्या शाखेतूनच झाली सुरूवात”
“संघाशी नातं लहानपणापासूनचं; संघाच्या शाखेतूनच झाली सुरूवात”
आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी
कुशीनगरचे डीएम विशाल भारद्वाज म्हणाले की, तक्रारीच्या आधारे संपूर्ण जमिनीचे मोजमाप करण्यात आले आहे. पुढील तपास अद्याप सुरू आहे. हे बांधकाम सरकारी जमिनीवर झाले आहे की नाही हे सर्व सरकारी नोंदी तपासल्यानंतरच ठरवता येणार आहे. तपास सुरू आहे, थोडा वेळ लागेल. जे खरे आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल, नियमानुसार कारवाई केली जाईल. स्थानिक लोकांच्या मते, मशिदीचे बांधकाम २००२ मध्ये सुरू झाले. २००४ पासून येथे मुस्लिम समाजाचे लोक नमाज अदा करत आहेत.