पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आज ( १८ डिसेंबर) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार दिल्लीत दाखल झाले. या भेटीदरम्यान शरद पवार साताऱ्यातील दोन शेतकऱ्यांना सोबत घेऊन गेले होते. या शेतकऱ्यांनी मोदींना त्यांच्या शेतातील डाळिंब भेट म्हणून दिली.
शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिले आहे. यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. या भेटीदरम्यान शरद पवार यांच्यासोबत दोन शेतकरी होते. यावेळी त्यांनी स्वतःच्या बागेतील भगवे डाळींब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. या भेटीचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
हे ही वाचा :
काँग्रेसने आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्याची तोडमोड करत गैरसमज पसरवला!
गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली, तीन मृत्युमुखी, कशी घडली दुर्घटना?
फरार विजय मल्ल्याची मालमत्ता विकून १४ हजार कोटी केले वसूल!
सत्तेच्या उबेत असलेले रिकाम्या हातांचे मुके घेतील कशाला?
दरम्यान, दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये हे संमेलन होणार असून ‘सरहद’ या संस्थेकडून संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम इथे साहित्य संमेलन पार पडणार आहे.