रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरूचं असून बराच काळ झाला पण युक्रेनने अद्याप रशियासमोर हार मानलेली नाही तर रशियानेही माघार घेतलेली नाही. मित्र देशांच्या मदतीने दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. याचं युद्धाच्या दरम्यान एक अचंबित करणारी घटना घडली आहे. काही रशियन सैन्य युद्धात मारले गेल्याचे वृत्त समोर आले आहे. पण, याची अधिकची माहिती अशी की, या सैनिकांना युक्रेनियन सैन्याने नाही तर त्यांच्या स्वतःच्या मित्र देशाच्या सैन्याने म्हणजेच उत्तर कोरियाच्या सैन्याने मारल्याचे समोर आले आहे.
रशियाने युक्रेनवर मात करण्यासाठी म्हणून उत्तर कोरियाकडे सैन्य मागितले होते. मित्र देशाला मदत करण्यासाठी म्हणून उत्तर कोरियाने याला होकार देत आपले सुमारे १० हजार सैनिक रशियाच्या बाजूने लढण्यासाठी पाठवले. पण, उत्तर कोरियाच्या सैन्याने यापूर्वी कधीही रशियन सैन्यासोबत काम केले नव्हते अथवा सराव केला नव्हता. शिवाय भाषा, भौगोलिक परिस्थिती याचा अंदाज उत्तर कोरियन सैन्याला नव्हता. याचं बाबी युद्धभूमीवर अडथळा ठरल्या.
गोंधळाच्या परिस्थितीनंतर उत्तर कोरियाच्या सैन्याने युद्धादरम्यान चुकून रशियन सैन्यावर गोळीबार केला. यात आठ रशियन सैनिकांचा मृत्यू झाला. भाषेच्या अडथळ्यामुळे ही दुर्दैवी घटना उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कुर्स्क प्रदेशात घडली, जिथे रशियन सैन्याने भूभाग पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. रशियन अधिकाऱ्यांच्या सूचना समजण्यास उत्तर कोरियाच्या सैनिकांना अडचणी आल्या आणि संबंधित घटना घडली.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये सापडले शिवमंदिर; काय आहे इतिहास?
संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?
बांगलादेशमध्ये जुलैपासून आवामी लीगच्या ४०० नेते, कार्यकर्त्यांचा मृत्यू!
सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर ४ हजार पाकिस्तानी भिकारी नो फ्लाय लिस्टमध्ये
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच दावा केला आहे की मॉस्कोने या वर्षी १८९ युक्रेनियन वसाहती पुन्हा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष चित्र वेगळे असल्याच्या चर्चा आहेत. कुर्स्कमधील घटना ही अपघातापेक्षा अधिक असून रशियाच्या निराशेचे प्रतीक आहे. परकीय सैन्यावरील वाढते अवलंबित्व हे रशियाचे सैन्य किती ताणलेले आहे हे अधोरेखित करते.