25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरराजकारण“आज याला भेट, त्याला भेट आणि दुसर्‍या दिवशी घरी थेट, अशी उद्धव...

“आज याला भेट, त्याला भेट आणि दुसर्‍या दिवशी घरी थेट, अशी उद्धव ठाकरेंची परंपरा”

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

Google News Follow

Related

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण १५ मिनिटे चर्चा देखील झाली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले होते. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

“मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधी पक्षही भेटतो. इतर पक्षाचे नेतेही भेटतात. पण हे चित्र पाहिल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटणं गैर नाही. पण याला भेट, त्याला भेट आणि दुसर्‍या दिवशी घरी थेट अशी ही परंपरा आहे,” असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

एकनाथ शिंदे पुढे असंही म्हणाले की, त्यांची कारस्थानं जगजाहीर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं आणि त्या यशानंतर हे लोक हुरळून गेले. यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळेल असं ठरवून टाकलं होतं. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं वाटप देखील करून टाकलं होतं. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंमध्ये अमुलाग्र बदल झालेले दिसत आहेत. हे चित्रही चांगलं आहे.

हे ही वाचा : 

मणिपूरमध्ये जप्त केलेल्या शस्त्रांत मस्क यांच्या स्पेसेक्स स्टारलिंकचे डिव्हाइस

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये सापडले शिवमंदिर; काय आहे इतिहास?

दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!

संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?

एकनाथ शिंदेंनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्या विरोधकांवरही निशाणा साधला. “जेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं. निवडणूक आयोग चांगलं असतं. सगळी न्यायालये चांगली असतात. पण, जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो तेव्हा मग ते ईव्हीएमवर आरोप करण्याचे काम करतात. २००४, २००९ मध्ये ईव्हीएमवर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो उदो केला,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा