26 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरराजकारणईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात

तृणमूल काँग्रेसने ईव्हीएमवरील काँग्रेसचे आरोप सपशेल फेटाळून लावले

Google News Follow

Related

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ‘इंडी’ आघाडीत फूट पडल्याचे समोर आले आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमबाबत काँग्रेसकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना हास्यास्पद ठरवले आहे. ओमर यांनी काँग्रेसला सवाल विचारला की, जर तुमचा ईव्हीएम मशिनवर विश्वास नाही तर तुम्ही निवडणुका का लढता? जेव्हा तुमचा यंत्रणेवर विश्वास असतो तेव्हा तुम्ही त्याची तारीफ करता अन्यथा नाही. ओमर यांनी काँग्रेसला सुनावल्यानंतर ‘इंडी’ आघाडीमधील आणखी एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही ईव्हीएमवरील आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत.

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही विरोधकांकडून होत असलेले ईव्हीएमवरील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी ईव्हीएमवरील काँग्रेस पक्षाचे आरोप फेटाळून लावले आहेत. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी करत आहे.

सोमवारी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, “जे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन डेमो दाखवावा. मॉक पोल आणि मतमोजणीच्या वेळी बूथवर काम करणारे लोक जर योग्य तपास करत असतील तर या आरोपात काही योग्यता आहे असे वाटत नाही. जर यापुढेही अजून कोणाला वाटत असेल की ईव्हीएम हॅक होऊ शकतात, तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटावे आणि ईव्हीएम कसे हॅक केले जाऊ शकतात ते सांगावे. नुसती निरर्थक विधाने करून काहीही होणार नाही.”

अभिषेक बॅनर्जी यांच्या विधानावरून ईव्हीएमच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेस ‘इंडी’ आघाडीसोबत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वीही अदानी यांच्या मुद्द्यावरून सातत्याने काँग्रेसकडून संसदेचे सत्र स्थगित करण्यावरून तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. शिवाय काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनालाही पक्षाने हजेरी लावली नव्हती.

हे ही वाचा  : 

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… 

दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही!

जे आपल्याकडे होते ते उद्या नसेल…मी नाराज नाही!

पॅलेस्टाईनचा उल्लेख असलेली पिशवी घेऊन प्रियांका गांधी संसदेत

दरम्यान, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसला सवाल विचारला की, जर तुमचा ईव्हीएम मशिनवर विश्वास नाही तर तुम्ही निवडणुका का लढता? जेव्हा तुमचा यंत्रणेवर विश्वास असतो तेव्हा तुम्ही त्याची तारीफ करता अन्यथा नाही. ओमर यांनी म्हटले की, माझे विचार हे मी कुणासोबत आहे त्यावर ठरत नाहीत तर ते तत्त्वांनुसार आहेत. त्याप्रमाणेच मी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवे संसदभवन उभारले जात आहे, ही उत्तम कल्पना आहे आणि अनेक वर्षे ती प्रलंबित होती, असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा