प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी निधन झाले. झाकीर हुसेन यांनी ७३ व्या वर्षी अमेरिकेत उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रूग्णालयात झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरू होते.
उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. गेल्या आठवड्यातही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा जास्त प्रकृती बिघडल्याचे लक्षात येता त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
जगाच्या पाठीवर संगीत विश्वात त्यांचे मोठे नाव होते. संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. झाकीर हुसेन यांना १९९० मध्ये संगीताचा सर्वोच्च सन्मान ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ही मिळाला आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या कारकिर्दीत सात वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
हे ही वाचा:
संभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी!
३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
सुनील पालचे अपहरण करणारा आरोपी गजाआड!
‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा खाँ यांचे पुत्र. झाकीर हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी तबला वाजविण्यास सुरुवात केली आणि तिथूनच त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले.