राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने सत्ता स्थापन केली आहे. सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला असून रविवारी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाकडून नितेश राणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“पक्ष नेतृत्वाने, मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टिकोनातून पाऊल टाकणार. तसेच लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद विरोधातले लढे असेच सुरू राहतील. दिलेले शब्द पूर्ण करतो. त्यामुळे धर्मांतर विरोधी कायदा निश्चितच आणणार,” असा निर्धार नितेश राणे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
संभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी!
३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
सुनील पालचे अपहरण करणारा आरोपी गजाआड!
‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’
विरोधकांवर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, विरोधकांच्या ईव्हीएमच्या विरोधातील आंदोलनाला काहीही अर्थ नाही. विरोधकांनी ईव्हीएम विरोधातील हेच आंदोलन लोकसभेच्या निकालानंतर केलं असतं, तर लोकांना कदाचित त्यावर विश्वास बसला असता. वायनाडच्या कुठल्यातरी पायऱ्या शोधल्या असत्या आणि त्यावर हे आंदोलन केलं असतं तर लोकांनी विश्वास ठेवला असता. लोकांनाही आता कळून चुकले आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीही वाटलं नाही. तेव्हा हे लोक हिरवा गुलाल उडवायचे. मात्र, आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आणले, हिंदू मतदार म्हणून आपली ताकद दाखवली तेव्हा या लोकांना हिरव्या मिरच्या लागत आहेत. म्हणुन हे जे काही करत आहे तो हिंदू समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधाच्या आंदोलनाला काहीही अर्थ नाही. असेही नितेश राणे म्हणाले.