राज्यात कोविड विरुद्ध लसीकरण मोहिम चालू आहे. सातत्याने लस पुरवठा सुरळीत होत नाही अशी ओरड करणाऱ्या ठाकरे सरकारचा खोटारडेपणा यापूर्वी देखील उघडा पडला आहे, तसाच यावेळी देखील लसींच्या पुरवठ्यावरून सरकार उताणे झाले आहे. ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्याला मनमानी पद्धतीने लसींचे वाटप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
टाटा उभारणार ४०० ऑक्सिजन प्लांट्स
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे
कोरोनाने अनाथ केलेल्या मुलांसाठी धावून आल्या स्मृती इराणी
कोविड चाचण्यांचे नवे नियम जारी, वाचा सविस्तर…
केंद्राकडून २६.७७ लाख लसी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र त्याच्या वाटपात आरोग्य मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे समोर आले आहे. यावरून आमदार अतुल भातखळकरांनी निशाणा साधताना ट्वीट केले आहे की,
केंद्राकडून मिळालेल्या २६.७७ लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?…
केंद्राकडून मिळालेल्या २६.७७ लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?… pic.twitter.com/UNfBHoMoCJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 5, 2021
ठाकरे सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवून लस उपलब्ध नसल्याचे रडगाणे गात आले आहे. मात्र आता त्यांचेच पाप उघड झाले आहे. केंद्राकडून मिळालेल्या लसींचे वाटप करताना मंत्र्यांच्या जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवली जात असल्याचे समोर आले आहे.