26 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरविशेषसंभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी!

संभलमध्ये मशिदी-मदरशांमधून १.३० कोटी रुपयांची वीज चोरी!

विद्युत विभागाने दिली माहिती

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये राबवण्यात आलेल्या वीज तपासणी मोहिमेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मोहिमेत चार मशिदी आणि एका मदरशासह ४९ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. आता विभागाने १ कोटी ३० लाख रुपयांच्या दंडाचा अहवाल तयार केला आहे. आरोपींकडून दंड वसूल केला जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या शनिवारी पहाटे ५ वाजता डीएम डॉ राजेंद्र पेन्सिया आणि एसपी कृष्ण कुमार विश्नोई यांच्या नेतृत्वाखाली वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या परिसरात वीज तपासणी मोहीम राबवली होती. ज्यामध्ये दीपा सराय, खग्गू सराय, रायसत्ती रोड आणि नखासा तिराहा विभागाचा सहभाग आहे. संभलचे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया यांनी सांगितले की, लाऊडस्पीकर तपासत असताना परिसरात वीज चोरी होत असल्याचे लक्षात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी ४९ ठिकाणांहून काट्या कनेक्शन पकडले होते.

विशेष म्हणजे चार मशिदी आणि एक मदरसाही वीजचोरीत सामील असल्याचे समोर आले आहे. येथे चोरीची वीज जवळपासच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जात होती. या प्रकरणी सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : 

ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

हिंदूंवरील अत्याचारा विरोधात मुलुंड चेकनाका ते विक्रोळीत ‘मानव शृंखला अभियान’

मुस्लिम बहुसंख्यांपेक्षा मोठे असू शकतात

विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नवीन गौतम यांनी सांगितले की, वीजचोरीच्या ४९ घटनांमध्ये १३० किलो वॅटची वीजचोरी उघडकीस आली आहे. या संदर्भात १.३० कोटी रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. अहवाल तयार करण्यात आला असून दंड वसूल केला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया यांनी सांगितले की, सप्टेंबरपासून या भागात वीजचोरीसंदर्भात १,२५० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मशिदीच्या वरच्या मजल्यावर एक “बेकायदेशीर पॉवर हाऊस” देखील आढळून आले आहे. या पॉवर हाऊसमधून परिसरातील १०० हून अधिक घरांना वीजपुरवठा होत असल्याचा आरोप आहे.

५९ पंखे, एक फ्रीज आणि ३० लाईट पॉईंट असलेल्या दुसऱ्या मशिदीत वीज मीटर बंद करण्यात आल्याचा आरोप आहे. “वीज चोरी थांबवण्याच्या आमच्या मोहिमेत आम्हाला आढळले की लोक पाच ते सहा मार्ग वापरतात… यापैकी काही पद्धती आमच्यासाठी नवीन आहेत. अशा प्रकारे वीज चोरी केली जाऊ शकते हे आम्हाला कधीच माहीत नव्हते,” असे  पेन्सिया म्हणाले. वीज चोरी थांबवण्यासाठी वीज विभाग, युपी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा