26 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरदेश दुनिया‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह

२६ नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्यानंतर सुचीर यांच्या मृत्यूची बातमी आता आली समोर

Google News Follow

Related

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या ऑपरेशन्स आणि पद्धतींबद्दल चिंता व्यक्त करणारे २६ वर्षीय माजी ओपनएआय संशोधक सुचीर बालाजी हे सॅन फ्रान्सिस्को येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याचे वृत्त समोर आले आहे. २६ नोव्हेंबर रोजी ते सॅन फ्रान्सिस्कोमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आता समोर आली आहे.

ChatGPT विकसित करणारी अग्रगण्य आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी ओपनएआयचे २६ वर्षीय माजी संशोधक सुचीर बालाजी हे सॅन फ्रान्सिस्को फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. सुचीर यांनी नुकतेच ओपनएआयच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचीर यांचा मृत्‍यू २६ नोव्‍हेंबर रोजी झाला मात्र १४ डिसेंबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे.

वृत्तानुसार, सुचीर बालाजी बरेच दिवसांपासून घराबाहेर पडले नव्हते. शिवाय ते त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या फोन कॉललाही उत्तर देत नव्हते. सुचीरचे मित्र आणि सहकारी त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. मित्र आणि सहकाऱ्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना बालाजीच्या अपार्टमेंटमध्ये बोलावण्यात आले. आल्यानंतर अधिकाऱ्यांना बालाजी यांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर २६ नोव्हेंबरला त्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली. त्यांच्या मृत्यूची बातमी आता समोर आली आहे. प्राथमिक तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा संशय आहे.

हे ही वाचा : 

सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार

हवाई दलाला मिळणार आणखी बळ; ताफ्यात दाखल होणार १२ सुखोई विमाने

सोमवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार

रस्‍ते कॉंक्रिटीकरणाच्‍या कामाचा दर्जा तपासा

सुचीर बालाजी यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये ओपनएआयमधून राजीनामा दिला होता. त्‍यांनी कंपनीवर कॉपीराइट उल्लंघनाचे गंभीर आरोप केले होते. चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचे नुकसान होत आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. सूचीर बालाजी यांच्‍या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींनी आश्चर्य व्यक्त केले असून, इंटरनेटवर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सुचीर बालाजी यांच्‍या मृत्‍यूच्‍या बातमीवर एक्सवर केवळ Hmm अशी प्रतिक्रिया दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा