बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात आज (१२ डिसेंबर) माहीममध्ये आंदोलन करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या माहीम, विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
पुरुष-महिला हातामध्ये पोस्टर घेवून आंदोलणात सहभागी होते. आंदोलनात सहभागी असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार ताबडतोब थांबला पाहिजे, तेथील पंतप्रधान युनुस यांनी जर तो अत्याचार थांबवला नाहीतर भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना योग्य उत्तर देण्याची गरज आहे.
याठिकाणी राहणाऱ्या बांगलादेशींना ताबडतोड येथून हाकलून दिले पाहिजे. यांना देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. जोपर्यंत बांगलादेशात हिंदुंवरील अत्याचार थांबत नाही, तोपर्यंत राज्यासह देशात एकही बांगलादेशी राहता कामा नये अशी आमची भूमिका आहे, असे सदासरवणकर यांनी म्हटले. दरम्यान, बांगलादेशच्या निषेधार्थ राज्यासह देशात निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. हिंदूंच्या संरक्षांची मागणी करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
जॉर्ज सोरोस हाच होता यूपीए सरकारचा रिंग मास्टर? ठाकरे- पवार विचारणार का जाब?
बस थांबवून चालकाने विकत घेतली दारू; कुर्ला घटनेची पुनरावृत्ती होणार?
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला २५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल!
प्रतापगडच्या पायथ्याशी पुन्हा झाले अतिक्रमण