27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषदेशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न

देशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न

Google News Follow

Related

देशात कोविडने थैमान घातले आहे. देशातील रुग्णवाढ अतिशय वेगाने होत आहे. त्यातच अत्यवस्थ रुग्णांना मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी देशात वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत. देशाबाहेरूनही भारताला मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. रेल्वे रो-रो सेवेच्या माध्यमातून ऑक्सिजनचे वहन वेगाने व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.

हे ही वाचा:

बंगालच्या सत्ताधाऱ्यांचे रक्तरंजित राजकारण भाजपा सहन करणार नाही

बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण

बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध

हवाई दलाचे प्रयत्न

भारताला देशाबाहेरून पाठवली जाणारी मदत वेळेत पोहोचावी यासाठी हवाई दल सातत्याने कार्यरत आहे. आठ सी-१७, चार आयएल-७६, दहा सी-१३०, वीस एएन-३२ त्यासोबत एमआय-१७व्ही५ आणि चिनुक हेलिकॉप्टर अहोरात्र उड्डाणे करत आहेत. या सर्वांनी मिळून आत्तापर्यंत ३६० तासांची उड्डाणे केली आहेत. या उड्डाणांतून हवाई दलाने आत्तापर्यंत १८० क्रायोजेनिक टँकर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन प्लांटची उपकरणे आणि इतर वैद्यकिय उपकरणे भारतात आणली आहेत.

रेल्वेची मदत

रेल्वेने देखील या कठिण काळात भारतीयांना हात दिला आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरातून ऑक्सिजन टँकर घेऊन निघालेली एक रेल्वे रात्री दिल्लीत पोहोचल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्याबरोबरच आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस दिल्ली छावणीला पोहोचल्याचे देखील त्यांनी ट्वीट केले होते.

गोवा राज्यात ऑक्सिजनचा समजून-उमजून वापर

एका बाजूला भारताला विविध तऱ्हेने मदत मिळत असताना, मुळातच वापर समजून- उमजून करण्याकडे गोवा राज्याने सुरूवात केली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात ऑक्सिजन, आणि त्याच्याशी निगडित विविध उपकरणांचा पुरवठा वाढला आहे. परंतु सध्याच्या काळातील मागणीची पुर्तता करण्यासाठी आम्ही प्राणवायूचा वापर गरज असेल तेव्हाच, समजून- उमजून करत आहोत. त्यामुळे आत्तापर्यंत गोव्यात कोणाचाही प्राणवायूच्या अभावाने मृत्यु झालेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा