कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानंतर सर्वत्र चिंता प्रकट होत असताना बांद्रा खेरवाडी येथे एक बसचालक दारूची बाटली घेऊन बसमध्ये चढल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
बांद्रा पूर्व खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही बस थांबलेली असून तिथे हा बसचालक बसमधून उतरून एका वाईन शॉपमध्ये उभा असल्याचे दिसते. तिथे तो दारूची बाटली विकत घेतो आणि पुन्हा चालकाच्या जागेवर येऊन बसतो.
या बस चालकाने वाईन शॉपच्या जवळ बस थांबवली आहे. पण त्याच्यावर लक्ष ठेवून असलेल्या तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला जाब विचारला तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तरुणांनी त्या बसमधील वाहकाला प्रश्न विचारले तेव्हा त्यानेही नीट उत्तरे दिली नाहीत.
हे ही वाचा:
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
एलन मस्कची संपत्ती ४०० अब्ज डॉलर्स पार!
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित प्रकरणी एनआयएकडून पाच राज्यात १९ ठिकाणी छापेमारी
आता यासंदर्भात पोलीस कोणती कारवाई करणार हा प्रश्न आहे. कुर्ला येथे जो बस अपघात झाला त्यात चालकाने अनेक लोकांना धडक दिली. गाड्याही चेपल्या. त्यात ७ लोकांचा मृत्यू झाला आणि ४० लोक जखमी असल्याचे कळते. या घटनेत चालक दारू प्यायला असल्याचे समोर येते आहे.
आता असे बसचालक गाडी चालवणार असतील तर असे अपघात पुन्हा होण्याची शक्यता वाढली आहे. या चालकांची नियुक्ती करताना त्यांची पार्श्वभूमी तपासली जाते का, मेडिकल होते का, त्यांच्या नावावर गुन्हे दाखल आहेत का याची पाहणी केली जाते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.