एलन मस्कची एकूण संपत्ती ४०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गुरुवारी (१२ डिसेंबर) मस्क यांची एकूण संपत्ती ४४७ अब्ज डॉलर्स (सुमारे ३८ लाख कोटी) झाली आहे. यासह, मस्क ४०० अब्ज डॉलर्सची संपत्ती ओलांडणारे जगातील पहिले अब्जाधीश बनले आहेत.
एलन मस्क यांच्या खाजगी मालकीच्या कंपनी स्पेस एक्सच्या ( SpaceX) शेअर्सच्या अंतर्गत विक्रीमुळे मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आणि त्यांची संपत्ती ५० अब्जने वाढून ४०० अब्ज पार गेली. टेस्लाच्या शेअरने बुधवारी (११ डिसेंबर) उच्चांक गाठला, ज्यामुळे मस्क यांची संपत्ती ४४७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मस्क यांनी गेल्या २४ तासांत ६२.८ अब्ज डॉलरची कमाई केली, जी जगातील अनेक श्रीमंत लोकांच्या एकूण संपत्तीला मागे टाकणारी आहे.
हे ही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
मंत्री मंडळात कोणताही तिढा नाही, फॉर्मुला ठरलाय, लवकरच कळेल
पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली. एका दिवसापूर्वी त्याचे शेअर्स सुमारे ६ टक्क्यांनी वाढले होते. ट्रम्प यांनी ५ नोव्हेंबरला निवडणूक जिंकली. एक दिवस आधी, ४ नोव्हेंबर रोजी, टेस्लाच्या शेअरची किंमत २४२.८४ डॉलर्स होती. आज (१२ डिसेंबर) गुरुवारी त्याची किंमत ४२४.७७ डॉलर्स आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या विजयानंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये जवळपास ७५ टक्क्यांनी वाढ झाली. टेस्ला व्यतिरिक्त, मस्कची संपत्ती त्याच्या इतर कंपन्यांच्या xAI, SpaceX इत्यादींद्वारे देखील वाढली आहे.
दरम्यान, या वर्षी, मस्क यांनी आतापर्यंत २१८ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. त्यांच्या एक वर्षाची कमाई ही त्यांची एकूण कमाई मानली तर या बाबतीत ते जगातील चौथे श्रीमंत असतील. २०० अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्कनंतर फक्त दोनच लोक आहेत. यात जेफ बेझोस आणि मेटा चे मार्क झुकरबर्ग आहेत. झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती २२४ अब्ज डॉलर आहे.