मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून फडणवीसांनी राज्याच्या कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, मंत्री मंडळाचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोणत्या पक्षाच्या किती खाती आणि कोणते मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच खाते वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री मंडळाच्या विस्ताराचा कोणताही तिढा नसल्याचे सांगत फॉर्मुला ठरला असून याबाबत लवकरच कळेल, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिलाच दिल्ली दौरा केला आणि आज (१२ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घेण्याची पद्धत आहे, त्यानुसार मी त्यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि महाराष्ट्रासंदर्भात काही चर्चाही झाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेकरीता महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचे राज्य आहे, राज्याला गतिशील ठेवणे गरजेचे आहे. यादृष्टीने आमचे सहकार्य असल्याचे पंतप्रधान मोदींनी भेटीदरम्यान सांगितले.
हे ही वाचा :
पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित प्रकरणी एनआयएकडून पाच राज्यात १९ ठिकाणी छापेमारी
मणिपूरमध्ये ‘प्रीपाक- प्रो’ प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक
जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी
ते पुढे म्हणाले, जे.पी.नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि पदाधिकाऱ्यांची काल भेट घेतली. राज्याच्या मंत्रीमंडळाबाबत तिढा सुटला नसल्याचे समोर येत आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्री मंडळाच्या विस्ताराचा कोणताही तिढा नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कामाने दिलील्ला आले आहेत, मी माझ्या कामाने इकडे आलो आहे. मंत्री कोण होणार हे ज्या-त्या पक्षाचे प्रमुख ठरवतील. मंत्री पदासाठी आमच्या पक्षाकडून लिस्ट काढली आहे, यावर वरिष्ठ स्तरावर निर्णय घेवून आम्हाला कळवतील. फॉर्मुला ठरला आहे, लवकरच कळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नेते आहेतच तसेच एक प्रकारे आमच्या पक्षामध्ये सर्वांकरिता पितृतुल्य अशाप्रकारचे ते नेतृत्व आहे. त्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत असते, चुकलो तर आमच्यावर रागावतातही, एका पालकाच्या भूमिकेमध्ये असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवरायांची प्रतिमा दिली. यावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा याकरीता दिली, २०१४ साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात रायगडावर येवून छत्रपती शिवरायांना नमन करून केली होती. त्यांची महाराजांवर खूप श्रद्धा आहे, महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे पंतप्रधानांना शिवरायांची प्रतिमा दिली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Extremely thankful to Hon PM Narendra Modi ji for your valuable time, guidance, blessings and standing firm behind Maharashtra.
In last 10 years, with your support Maharashtra is Number 1 in almost every sector and now aims to take this journey of VIKAS to the next level under… pic.twitter.com/nr6pmBG5UC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2024