24 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरविशेषदोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा!

दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा!

भाजपा नेते नितेश राणे यांची मागणी

Google News Follow

Related

बांगलादेशात हिंदुंवरील अत्याचारा विरोधात हिंदू समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. देशासह राज्यभरात निदर्शेन, आंदोलने करण्यात येत आहेत. हिंदुंवरील अत्याचारा विरोधात आज (११ डिसेंबर) सिंधुदुर्गमध्ये न्याय यात्रा काढण्यात आली. भाजपा नेते नितेश राणेसह हजारो लोक न्याय यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंदुंच्या पाठीमागे भारत देश पाठीशी असल्याचे सांगत मुख्यमंत्री लाडकी योजनेवरून मोठी मागणी केली आहे.

बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचारा विरोधात सकल हिंदू समाज महाराष्ट्राकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज न्याय यात्रा काढण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये देखील आज न्याय यात्रा काढण्यात आल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आमचा प्रचंड विश्वास आहे, ते कोणत्याही हिंदुंवर अत्याचार होवू देणार नाहीत. आजच्या या न्याय यात्रेने निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला बांगलादेशमध्ये पोहोचवायचे आहे.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जर परवानगी दिली तर पाच मिनिटांमध्ये बंगालदेश स्वच्छ करू. बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार होत आहेत, धर्मगुरुणा ठेचून मारले जात आहे. इस्कॉनच्या धर्मगुरुणा अटक केली जात आहे, यांची केस लढणाऱ्या वकिलांना देखील मारले जात आहे. माता-बहिणींवर सामुहिक बलात्काराच्या घटना वाढत आहेत. बौद्ध समाजाला लक्ष करून मूर्त्यांची तोडफोड केली जात आहे.

हे ही वाचा : 

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!

बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून ते म्हणाले, दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यास लाडकी बहिण योजनेतून बाहेर काढले पाहिजे. कारण, मतदान करताना यांना मोदिजी नको, हिंदुत्ववादी विचारांचे महायुती सरकार नको. मात्र, अन्य वेळी शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेणारे मुस्लीम समाजाचे कुटुंब असतात. तुम्हाला जर तुमचा धर्मच महत्वाचा असेल तर लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमध्ये जी लाभार्थींची यादी आहे, त्यामध्ये अधिक लाभार्थी हे त्याच समाजाचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती करत ते म्हणाले, आदिवासी समाजाला वगळून अन्य जणांना दोन पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना योजनेमधून वगळावे. जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि जे सरकारला मतदान करतात, मोदींच्या, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात त्यांचाच योजनेचा लाभ होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा