24 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरधर्म संस्कृतीबांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर

राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्यांकांवर आणि विशेषतः हिंदुंवर वारंवार हल्ले केले जात आहेत. हिंदूंच्या मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद आता जगभरात दिसून येत असून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्रातही हिंदू समाज जागृत झाला असून बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला जात आहे. मुंबईतील मालाड, कांदिवली, मरोळ येथेही हिंदू समाजाने एकत्र येत बांगलादेशमधील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही मालाड पूर्व आणि कांदिवली पूर्व येथे बांगलादेशातील हिंदूचे समर्थन करण्यासाठी आवाज उठवला. अतुल भातखळकर म्हणाले की, “डावी बांडगुळं कायम गाझावर डोळे लावून असतात. All Eyes on Gaza असा प्रपोगंडा करत असतात. उर बडवत असतात. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मात्र त्या सर्वांची दातखीळ बसली आहे. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्तानबाबत ज्यांच्या धमन्यांमधून अभिमान सळसळतोय असे सकल हिंदू ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलेले. निषेधाचा आवाज बुलंद करण्यासाठी. मालाड पूर्व आणि कांदिवली पूर्व येथे सायंकाळी आम्ही बांगलादेशातील हिंदूचे समर्थन करण्यासाठी आवाज उठवला. बांगलादेशातील हिंदूद्वे्ष्ट्या मोहम्मद यूनस सरकारचा धिक्कार केला.” यावेळी गाझाच्या मुद्द्यावर अश्रू आणि हिंदूंच्या मुद्द्यावर मौन अशी दुटप्पी भूमिका घेणारे कोण आहेत हे लोक? असा प्रश्न विचारणारे पोस्टर्स घेऊन लोक रस्त्यावर उतरले होते.

दुसरीकडे, मरोळ येथे उमेश राणे यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाज बांगलादेशी सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. ‘चला धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा’, ‘बांगलादेशमध्ये हिंदुंवर होणारे अत्याचार तत्काळ थांबवा’, ‘बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हटवा’ अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते.

तसेच, बांगलादेशातील हिंदू, बौद्ध अल्पसंख्याक बांधवांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांविरोधात मंगळवारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी हिंदूंच्या न्याय मानवी हक्कांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे बांगलादेशी अल्पसंख्याक न्याय मोर्चा संपन्न झाला. यावेळी महंत रामगिरीजी महाराज, पू. डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य, पू. सुदर्शनमुनी कपाटे महाराज, वंदनीय भदंत सुदत्त बोधी, पू. गौरांग प्रभू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाजाने हजेरी लावत बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त केला.

हे ही वाचा : 

अवॉर्ड शोसाठी बोलावून अभिनेत्याचे अपहरण, १२ तास केले अत्याचार!

“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”

दिल्ली विधानसभेसाठी ‘आप’ची काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता नाहीचं!

आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी

बांगलादेशमधील हिंदूंना न्याय मिळवून द्यावा म्हणून सकल हिंदू समाज, नाशिक शाखेतर्फे मंगळवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ‘बांगलादेशातील हिंदू हक्कांसाठी आम्ही पाठीशी उभे आहोत’, ‘हिंदू नरसंहार रोखा, अन्यथा गंभीर परिणाम होतील’, ‘बांगलादेशी हटाव, हिंदुस्तान बचाव’, ‘जातपात सोडू, हिंदू म्हणून सारे एक होऊ’ आदी फलकांनी लक्ष वेधून घेतले होते.

तर अत्याचारांचा धिक्कार करण्यासाठी मंगळवारी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओरोस, सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू समाज एकवटलेला पाहायला मिळाला. तर, रविवारी (८ डिसेंबर) ठाणे, घाटकोपर आणि मीरा भाईंदरमध्ये समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा