32 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरविशेषहिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात सिंधुदुर्गात 'बांगलादेश हिंदू न्याय यात्रा'

हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात सिंधुदुर्गात ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रा’

भाजपा नेते नितेश राणे, निलेश राणेंसह मोठ्या संख्येने हिंदू समाज सहभागी

Google News Follow

Related

बांगलादेशात हिंदुंवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यावर बांगलादेश सरकार कोणतीही कारवाई करताना  दिसत नाहीये. देशासह परदेशातही चिंता व्यक्त केली जात आहे. हिंदुंवरील अत्याचाराविरोधात देशात आणि राज्यातही मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये आज (१० डिसेंबर) ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रा’ पार पडली. सकल हिंदू समाजाकडून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या न्याय यात्रेला भाजपा नेते आमदार नितेश राणे, निलेश राणे, आमदार दीपक केसरकर आदी नेते उपस्थित होते.

बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू झाले आहेत. मंदिरांची नासधूस होते आहे. मोहम्मद यूनस यांचे हंगामी सरकारचे याला मूक समर्थन आहे. या अत्याचारांचा धिक्कार करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओरोस, सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू समाज एकवटलेला पाहायला मिळाला.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील ट्वीटकरत न्याय यात्रेची माहिती दिली. ते म्हणाले, बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू व बौद्ध समाजातील नागरिकांवर हल्ल्याच्या व अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओरोस सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मुक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी सकल हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नागपूर आणि अमरावतीमध्येही आज आंदोलन करण्यात आले. नागपूरमध्ये आरएसएस आणि सकल हिंदू समाजाकडून अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचा : 

ईव्हीएमवर दोन वेळा केंद्रात सत्ता भोगली, आता ओरडत आहेत!

ममता बॅनर्जींच्या आमदाराकडून बाबरी मशीद बांधण्याची घोषणा, १ कोटीही देणार!

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

शरद पवारांचा पक्ष म्हणजे गुंड, लुटारुंची टोळी; ते गाडायचे काम देवाभाऊने केले

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा