27 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरक्राईमनामापंतप्रधानांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज करणारा अजमेरमधून अटक

पंतप्रधानांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज करणारा अजमेरमधून अटक

मुंबई पोलिसांना मिळाला होता मेसेज

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखल्याचा धमकीचा मेसेज टाकणाऱ्या एकाला राजस्थान मधील अजमेर येथून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद बेग मिर्झा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मालकाने कामावरून काढल्यामुळे नैराश्याच्याभरात त्याने धमकीचा मेसेज केल्याचे कबूल केले आहे.

मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या हेल्पलाईन व्हाट्सअप्प क्रमांकावर शनिवारी, पहाटे २ वाजता,एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज प्राप्त झाला होता. या मेसेज मध्ये देशाचे पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला. काही व्यक्ती मुंबई आणि धनबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा आणि भारतीय लष्कराला कमकुवत करण्याचा कट रचत असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. शिवाय, संशयितांपैकी एक पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

कर्नाटक काँग्रेसचा मुजोरीपणा, विधानसभेतून वीर सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय!

कॉमेडियन सुनील पाल अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल, अपहरण कर्त्यांनी ८ लाख घेऊन केली सुटका

कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक; ६ जणांचा मृत्यू

लोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!

मेसेजमध्ये एका कंपनीत बेकायदेशीर शस्त्रास्त्रे तयार करण्यात येत असल्याचा तसेच पंतप्रधान आणि लष्कराला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा उल्लेख आहे. या मेसेजमध्ये प्रिन्स खान आणि इरफान रझादिया या दोन व्यक्तींची नावे टाकण्यात आली होती. मेसेज करणाऱ्याने दावा केला की, दोघांपैकी एकाने धनबादमध्ये आणि दुसऱ्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखली होती. त्यात इरफान नावाच्या व्यक्तीशी जोडलेला मोबाईल क्रमांकही होता.

या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू करून मोबाईल क्रमांक राजस्थान येथील अजमेर येते ट्रेस करण्यात आला. पोलीस पथक अजमेर येथे रवाना झाले आणि अजमेर येथुन मोहम्मद बेग मिर्झा याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मालकाला अद्दल घडविण्यासाठी हे कृत्य केल्याचे कबूल केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा