27 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरविशेषकुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक; ६ जणांचा मृत्यू

कुर्ल्यात बेस्ट बसची अनेकांना धडक; ६ जणांचा मृत्यू

ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती, ३०-३५ जण जखमी झाल्याची माहिती

Google News Follow

Related

मुंबईत कुर्ला एलबीएस रोडवर बेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. ही भरधाव बेस्ट बस ब्रेक फेल झाल्यामुळे मार्केटमध्ये शिरली आणि अनेकांना तिने धडक दिली, अशी माहिती समोर येते आहे. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ३०-३५ लोक जखमी असल्याची माहिती मिळते आहे. कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात काही सीसीटीव्ही क्लिप समोर आल्या असून त्यात एका रिक्षाला या बसने जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. त्या रिक्षाला काही अंतरापर्यंत त्या बसने फरफटत नेल्याचेही दिसते आहे. रस्त्याच्या कडेला बसलेल्या अनेकांना तसेच दुचाकींना त्या बसने ठोकरल्याचेही सीसीटीव्हीत दिसते आहे.

ही ३३२ क्रमांकाची बस होती. कुर्ला रेल्वे स्टेशन ते अंधेरी स्थानक या मार्गावरील ही बस होती. रात्री ९.२० वाजता कुर्ला रेल्वे स्टेशन वरून बस निघाली. पण न्यू मॉडेल टॉकीज येथे पोहोचल्यावर ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले असावे असे कळते. पण त्यामुळे जवळपास पुढील १०० मीटरपर्यंत तो चालक बस सगळ्यांना धडकत निघाला. आंबेडकर नगर चौक इथे आल्यानंतर त्याला एक कमान दिसली. त्या कमानीला बस धडकवून थांबवता येईल, हे ओळखून तिथे त्याने बस धडकवली. तोपर्यंत अनेक लोक जखमी झाले होते. यात ३ पोलिसही जखमी झाले आहेत. कारण ही बस पोलिस व्हॅनलाही धडकली.

हे ही वाचा:

‘जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्या’ला फडणवीसांनी का केला फोन?

‘हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत चिंतेत’

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!

मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!

या बसच्या चालकाला आता ताब्यात घेण्यात आले आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्किंग असल्यामुळे रस्ता दाटीवाटीचा आहे. अपघातानंतर पोलिसांनी हा रस्ता बंद केला आहे. मात्र तिथे आता लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

एलबीएस रोड हा दाटीवाटीचा परिसर मानला जातो. मार्केट असल्यामुळे अनेक लोक तिथे खरेदीसाठी येत असतात. असं असताना या परिसरात भरधाव बस चालवण्यात आली. भरधाव बेस्टने अनेक वाहनांना धडक दिली आहे. बेस्ट बसने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत होता.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी गर्दीला बाजूला सारत बचावकार्याला सुरुवात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा