भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे बांगलादेश दौऱ्यावर आहेत. विक्रम मिसरी यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद आणि त्यांचे समकक्ष मोहम्मद जसीमुद्दीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, ‘बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आम्ही अलीकडील घडामोडींवर चर्चा केली आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारत सरकार चिंतेत असल्याचे अंतरिम सरकारला कळवले. अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक मालमत्तेवरील हल्ल्यांच्या घटनांवरही बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
ऑगस्टमध्ये झालेल्या राजकीय बदलानंतरही भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या संपर्कात असल्याचे विक्रम मिसरी यांनी सांगितले. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे अभिनंदन करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले जागतिक नेते होते. यानंतर पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्यात फोनवर बोलणे झाले आणि संबंध सुधारण्यावर चर्चा झाली.
हे ही वाचा :
तुम्ही आमच्यावर कब्जा कराल तर आम्ही लॉलीपॉप खात बसू का?
१०३ शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलं… राज ठाकरे वक्फ बोर्डाविरोधात
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरणार का?
मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!
परराष्ट्र सचिव म्हणाले की, शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतरही भारताचे परराष्ट्र मंत्री आणि बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार एकमेकांच्या संपर्कात होते. सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये झालेल्या UNGA (संयुक्त राष्ट्र महासभा) च्या वेळीही या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.
बैठकीदरम्यान सर्व वार्ताहरांनी स्पष्ट आणि रचनात्मकपणे आपले विचार व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘भारताला बांगलादेशसोबत सकारात्मक, रचनात्मक आणि परस्पर फायदेशीर संबंध हवे आहेत यावर मी भर दिला. मी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला एकत्र काम करण्याच्या भारताच्या आकांक्षा सांगितल्या आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात संबंध चांगले असावते, त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना फायदा होईल, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी म्हटले.
#WATCH | Dhaka: After meeting Foreign Adviser Md. Touhid Hossain of Bangladesh, Foreign Secretary Vikram Misri says, "… We also discussed recent developments and I conveyed our concerns including those related to the safety and welfare of minorities… We also discussed… pic.twitter.com/FUXzwluzqs
— ANI (@ANI) December 9, 2024