मारकडवाडी गावच्या मुद्यावरून सध्या जोरदार राजकरण सुरु आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-टीका होत आहे. याच दरम्यान, शरद पवारांची आज (८ डिसेंबर) मारकडवाडी गावात सभा पार पडली. यावेळी त्यांनी गावातील ग्रामस्थांची संवाद साधत ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, असे आवाहन केले. दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आणि लोकशाहीवरून विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान पवारांनी करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
सभेला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला त्यांनी अस सांगितले, पवार साहेबांनी हे करण योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली, तुमच्या गावी येण चुकीचं आहे का?, तुमचं म्हणण ऐकून घेण चुकीच आहे का?, मुख्यमत्र्यांना विनंती करतो. तुम्ही स्वतः या गावात या, लोकांचे-महिलांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करण्यासंदर्भात त्यांना सहकार्य करा, असे शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा :
मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिकासाठी पात्र नाहीत, पुरस्कार काढून घ्या!
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?
हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!
पंजाब-हरियाणा सीमेवरून दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावाला रोखले
यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी झालेला पराभव, जनतेचे मत स्वीकारले पाहिजे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. विनाकारण लोकशाही वरचा लोकांचा विश्वास उठेल, प्रक्रियेवरून विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवारांनी करू नये, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शक्य असले तर तालुक्यातील सर्व गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे, असे शरद पवारांनी गावकऱ्यांना आवाहन केले. तुम्ही ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहचवू असे शरद पवार म्हणाले. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केल आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जेव्हा आपण स्वतः निवडणूक जिंकतो तेव्हा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा दुटप्पीपणा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.