24 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरसंपादकीयराहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात होणार?

राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात होणार?

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी करून दाखवल्या. राम मंदिर, कलम ३७०, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट, अशी यादी खूप मोठी आहे. अशीच एक गोष्ट जी आज अशक्य वाटते आहे, त्या दिशेने मोदी सरकारची पावले पडायला लागली आहेत, असे मानायला वाव आहे. सोनिया गांधी यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठआहेत. राहुल गांधी सुद्धा न्यायालयाच्या वाऱ्या करतायत. येत्या काही काळात राहुल गांधी तुरुंगात गेले तर आश्चर्य वाटणार नाही, अशा वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत.

भाजपाचे अत्यंत यशस्वी प्रवक्ते आणि पूरीचे खासदार संबित पात्रा यांनी अलिकडेच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी आरोप केले की राहुल गांधी हे देशद्रोही आहेत. विदेशी शक्तींशी हातमिळवणी करून ते देशविरोधी कारवाया करीत आहेत. भाजपा हा सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाचा एक खासदार पत्रकार परिषद घेतो आणि अशा एका नेत्यावर देशद्रोहाचे आरोप करतो जो फक्त खासदार नाही तर लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाचा सर्वमान्य नेता आहे. मिडीया पार्ट या फ्रेंच प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या मीडिया रीपोर्टच्या आधारावर संबित पात्रा यांनी हा आरोप केला आहे. ऑर्गनाईज्ड क्राईम एण्ड करप्शन प्रोजेक्ट रिपोर्ट नावाची आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था या अहवालाच्या केंद्र स्थानी आहे.

 

जगातील प्रत्येक खंडात या वृत्तसंस्थेचे जाळे पसरलेले आहे. जॉर्ज सोरोस या उपद्व्यापी उद्योजकाची ओपन सोसायटी ही एनजीओ आणि काही अमेरीकी डीप स्टेट या वृत्तसंस्थेला वित्त पुरवठा करतात. ही वृत्तसंस्था भारतीय अर्थकारणाला, उद्योगपतींना लक्ष्य करणारे बिनबुडाचे वृत्तअहवाल प्रसिद्ध करते. संसदीय अधिवेशनाच्या ठीक आधी हे अहवाल प्रसिध्द
केले जातात. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष याच अहवालावरून मोदी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो. संसदेचे काम ठप्प केले जाते. याच ओसीसीपीमधून अनेकदा मोदी सरकार, राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे देशाची जनता रस्त्यावर उतरलेली आहे, अशा प्रकारचे बोगस रिपोर्टही प्रसिद्ध झालेले आहेत.

हे ही वाचा:

लातूरमधील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विरोधी आमदारांचा शपथ घेण्यास नकार

सीरियामध्ये गृहयुद्ध भडकलं; भारतीयांना प्रवास टाळण्याचा भारत सरकारचा सल्ला

लग्न सोहळ्यात थुंकून रोट्या बनवणाऱ्या साहिलला अटक!

जॉर्ज सोरोस यांनी उघड उघड मोदी सरकार हटवण्याची भूमिका घेतली आहे. उद्योगपती अदाणी यांनाही जाहीरपणे लक्ष्य केलेले आहे. याच सोरोस यांच्या ओपन सोसायटीचे उपाध्यक्ष असलेले सलील शेट्टी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होते. त्यांच्या विदेश दौऱ्यात भारतविरोधासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकी सिनेट सदस्य इल्हान ओमर, बांगलादेशी पत्रकार मुश्फीकूल फजल अशाच लोकांना राहुल गांधी भेटत असतात. दिल्लीत २०२० मध्ये झालेल्या दंगली दरम्यान आनंद मंगनले या ओसीसीआरपीच्या पत्रकाराने चीनकडून आलेली रक्कम या दंगलीचा मास्टर माईंड शर्जिल इमामकडे पोहोचवली होती. हा मंगनले राहुल गांधी यांचा मित्र आहे. भारतात अस्थिरता निर्माण करणे, संसदेचे कामकाज बंद पाडणे आणि अर्थकारण बर्बाद करणे हाच त्यांचा अजेंडा आहे, असा आरोप पात्रा यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये राहुल गांधी यांचा ब्रिटन आणि अमेरिकेत दौरा झाला. या दौऱ्यात भारताच्या अर्थकारणावर शरसंधान करताना त्यांना चीनची भलामण केली. चिनी मुत्सद्यांना ते सतत भेटत असतात. भारत हा एक देश नसून राज्यांचा समुह आहे, अशा प्रकारची विखारी विधानेही राहुल गांधी यांनी केलेली आहेत. संबित यांनी राहुल यांना देशद्रोही म्हटल्यानंतर राहुल यांच्या भगिनी नव्या नव्या संसदेत दाखल झालेल्या प्रियांका वाड्रा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. संबित यांना हक्कभंगाची नोटीसही पाठवण्यात आली आहे. पात्रा यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

जर हे सत्य आहे, तर गेली तीन वर्षे प्रत्येक अधिवेशनाच्या आधी एकाच मीडियात भारतविरोधी वृत्तअहवाल प्रसिद्ध होतात, त्याच अहवालाच्या आधारावर संसदेत हंगामा केला जातो. संसदेचे कामकाज बंद पाडले जाते, हे कसे काय? राज्यसभेतील खासदार भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी तर तारीखवार ही माहीत राज्यसभेत ऐकवली आहे. आता मुद्दा हा निर्माण होतो की राहुल गांधी आणि ओपन सोसायटीचे हे मेतकुट नवे नाही. राहुल गांधी यांची देशद्रोही विधानेही नवी नाहीत. मग राहुल गांधी हे ट्रेटर ऑफ हायेस्ट ऑर्डर हे सांगायला भाजपाने इतका वेळ का घेतला. भाजपाने आता हे आरोप केलेच आहेत, तर
देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांची तुरुंगात रवानगी होणार आहे काय? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. सरकारने याबाबत जनतेचे शंका समाधान कऱण्याची गरज आहे. राहुल गांधी यांचे दुहेरी नागरिकत्व, त्यांचा नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार खटला, देशभरातील न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले बदनामीचे खटले पुढे सरकत का नाहीत, हा प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

सरकारने आता राहुल गांधी हे देशद्रोही आहेत, हे डंके की चोट पे सांगितेल आहे. मग आता राहुल यांच्यावर देशद्रोहप्रकरणी कारवाई करणे, त्यांची रवानगी तुरुंगात करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी बनते. गांधी कुटुंबियांच्या भ्रष्टाचार प्रकरणाबाबत केंद्र सरकार गंभीर आहे, याचे संकेत मिळाले आहेत. सरकारने बोफोर्स प्रकरणाची फाईल पुन्हा
उघडली आहे. सरकारने ही प्रकरणे लोंबकळत न ठेवता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा आणि राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात करावी ही जनतेची अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा