शपथविधी सोहळ्याच्या दोन दिवस अगोदर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री होण्यास सहमती दर्शविली असल्याचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
एकनाथ शिंदेंची मनधरणी कोणी केली?, तुम्ही केली कि दिल्लीमधून फोन आला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिंदे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे मान्य केले होते. मात्र, एकनाथ शिंदे हे सरकारचा भाग न राहता युतीचा कारभार सुरळीत चालावा यासाठी समन्वय समितीचे प्रमुख असावे, तर मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा अशी शिवसेनेच्या काही नेत्यांची इच्छा होती. पण, आमच्या मनात कोणतीही शंका नव्हती. शिंदे यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. माझी भेट झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
हे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित…
शोध मोहिमेदरम्यान लष्कराच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
बांगलादेशातील परिस्थितीवर जगाचे मौन, पवन कल्याण म्हणाले- आता तुमचा राग कुठे आहे?
शंभूराजे म्हणाले, ठाकरेंनी आमच्याकडे बोट दाखवून स्वतः मुख्यमंत्री झाले!
‘गृहमंत्रालय नेहमीच आमच्यासोबत असते’
एकनाथ शिंदे गृहमंत्रालय मागत आहेत का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, आतापर्यंत त्यांनी असे कोणतेही मंत्रालय मागितले नाहीये. मात्र, तीन-चार मंत्रालयावर चर्चा करण्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर आम्ही चर्चा करू. गृहमंत्रालयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुळात आम्हाला असे वाटते कि गृहखाते आमच्याकडे रहावे आणि नेहमीच आमच्यासोबत राहिले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय भाजपकडे असल्याने समन्वय साधण्यास मदत होते, त्यामुळे गृहखाते आमच्याकडे असते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.