32 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरराजकारण“मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…”

“मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…”

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी दिली शपथ

Google News Follow

Related

मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की… असे म्हणत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. यासोबतच त्यांनी गोपनीयतेचीही शपथ घेतली. २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार पाहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच आझाद मैदानात उपस्थित सर्वांनी मोठा जल्लोष केला. यामुळे आता राज्यात देवेंद्र ३.O च्या पर्वाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी रवाना होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या आईकडून औक्षण करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने बुधवरी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महायुतीच्या नेत्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. दरम्यान, भाजपाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झाल्यामुळे राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे चित्र स्पष्ट झाले होते.

यानंतर, ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हे ही वाचा : 

बिहार : इन्स्पेक्टर खानने मदतीची गरज असलेल्या महिलेचा केला विनयभंग

बाबर, बांगलादेश आणि संभलमधील समाजकंटकांचा डीएनए एकच!

मालदामधील हॉटेलमध्ये बांगलादेशींना प्रवेश बंदी!

‘इंडी’च्या खासदारांनी अदानींविरोधातील केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेस गायब!

या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मंत्री, एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक दिग्गज मंडळी, संत, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनीही या सोहळयाला उपस्थित लावली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा