27 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरक्राईमनामाहैद्राबादहून मुंबईत अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या आवळल्या मुसक्या

हैद्राबादहून मुंबईत अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या आवळल्या मुसक्या

वाशी येथील कारवाईमधून १६ किलो एमडी जप्त

Google News Follow

Related

हैद्राबाद येथून मुंबईकडे अमलीपदार्थाची तस्करी करणाऱ्या चार तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चार तरुण बसमधून अंमलीपदार्थाची तस्करी करत होते यावेळी नवी मुंबईतील वाशी येथून त्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांजवळ १६ किलो एमडी (मेफेड्रोन) हा अमलीपदार्थ आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (डीआरआय) केली आहे. मनीष बर्दावाल, रविंदर बर्धवार, महेश खरवा आणि सुलतान अहमद अब्दुल लतीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

डीआरआयच्या मुंबई विभागाला गुप्त माहिती हाती लागली होती की, हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या बसमधून रवी आणि मनीष नावाच्या दोन व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन या अमलीपदार्थाची तस्करी करण्यात येत आहे. शिवाय ही बस मंगळवारी वाशी येथे पोहोचणार आहे. तसेच या व्यक्ती वडोदरा येथून मुंबईत आलेल्या महेश खारवा याला प्रतिबंधित अमलीपदार्थ पोहोचवत आहेत आणि मुंबईत मांडवी जवळील एका हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत.

हे ही वाचा:

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार

विरोधक देशविरोधी कारवाया करत आहेत… दक्षिण कोरियात गोंधळ

अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ला ऍडव्हान्स बुकिंगमधून मिळाले १०० कोटी

मंदिरांमधून मूर्तींची चोरी करणाऱ्या यासीन आणि आमीनच्या मुसक्या आवळल्या

या माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांनी वाशी उड्डाणपूलजवळील बस स्टॉपजवळ बस अडवत रविंदर आणि मनीष यांना अडवून चौकशी केली असता त्यांच्याकडे अमलीपदार्थ आढळून आले. १६ किलो एमडी घेऊन ते हैदराबादहून मुंबईला मेफेड्रोन पुरवण्यासाठी एकत्र प्रवास करत होते. त्यानंतर हा अंमली पदार्थ डीआरआय अधिकाऱ्यांनी जप्त केला. डीआरआयने महेश याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत तो मनीष आणि रविंदर यांच्याकडून १६ किलो मेफेड्रोनची डिलिव्हरी घेऊन ते अमलीपदार्थ पुढे त्याचा एक साथीदार सुलतान अहमद अब्दुल लतीफ शेख याला देणार होता, या बदल्यात त्याला पैसे मिळणाऱ होते, असे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर सुलतान अहमद अब्दुल लतीफ शेख याला डीआरआय अधिकाऱ्यांनी अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा