33 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरदेश दुनियाजो बायडन यांचा यू-टर्न; शस्त्र आणि कर फसवणूक प्रकरणात मुलाला केले माफ

जो बायडन यांचा यू-टर्न; शस्त्र आणि कर फसवणूक प्रकरणात मुलाला केले माफ

कुटुंबातील सदस्यांच्या फायद्यासाठी अध्यक्षपदाच्या अधिकारांचा गैरवापर केल्याने खळबळ

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचा मुलगा हंटर बायडन याला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याबद्दल आणि कर चुकवेगिरी प्रकरणात माफी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. देशात अशाप्रकारे मुलाला सोडविण्यासाठी पदाचा गैरवापर राष्ट्राध्यक्षांनी केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बायडेन आपल्या मुलाची शिक्षा कमी करणार नाहीत किंवा त्याला माफ करणार नाहीत, असे व्हाईट हाऊसकडून सातत्याने सांगितले जात होते. त्यानंतर हा निर्णय समोर आला आहे.

जो बायडन यांनी कुटुंबातील सदस्यांच्या फायद्यासाठी अध्यक्षपदाच्या अधिकारांचा वापर न करण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या आश्वासनांवरून यू-टर्न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर बायडन यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांच्या मुलाला लक्ष्य केले गेले आहे. कारण तो त्यांचा मुलगा आहे. बायडन यांच्या निर्णयाने हंटरला अवैध बंदुक तस्करी आणि करचोरीमध्ये दोषी आढळल्याने त्याला तुरुंगात जाण्यापासून वाचवले आहे.

बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी घेत असताना आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपल्या शक्तींचा वापर न करण्याचे आश्वासन अमेरिकन जनतेला दिले होते. त्यानंतर आता त्यांच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात त्यांनी एक पत्र जारी करून मी माझा मुलगा हंटरला माफी दिली आहे, हे जाहीर केले.

जो बायडन यांनी म्हटले आहे की, “मी राष्ट्राध्यक्ष पद घेतले तेव्हा सांगितलेले की न्याय विभागाच्या निर्णयात दखल देणार नाही, हे आश्वासन मी पाळले देखील आहे. मात्र, माझ्या असे लक्षात आले की, माझ्या मुलाला लक्ष्य केले जात आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकविले जात आहे. त्याच्यावर लावलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरीत होते. जो कोणी समजूतदार व्यक्ती हंटरच्या केसबाबत माहिती ठेवत असेल त्याला हंटरला कसे मुद्दामहून लक्ष्य केले गेले हे नक्कीच समजेल. मला वाटते की एक वडील आणि राष्ट्रपतींनी हा निर्णय का घेतला असेल हे अमेरिकी नागरीक समजून घेतील,” असे बायडेन यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा..

“भाजपच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाला मनात किंतू- परंतु न ठेवता पाठींबा”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा

सिब्बल, पित्रोडांसोबत दिसलेला शुजा पुन्हा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करतोय!

कॅनडातील खलिस्तानींची नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी

काय प्रकरण आहे?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच हंटरला माफी दिली आहे. हंटर हा बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे आणि बंदुकीच्या तपासात खोटी माहिती दिल्याप्रकरणी दोषी आढळला होता. बायडन आपल्या मुलाची शिक्षा कमी करणार नाहीत किंवा माफ करणार नाहीत, असे व्हाईट हाऊसकडून सांगितले जात होते.

हंटर याला दोन प्रकरणांत शिक्षा होणार होती. २०१८ मध्ये बंदूक खरेदी केल्याप्रकरणी हंटरला जूनमध्ये डेलावेअर फेडरल कोर्टात दोषी ठरवण्यात आले होते. हंटरने आपल्याला अवैध ड्रग्सचे व्यसन नसल्याचा दावा करून खोटे बोलले होते, असा आरोप त्यात होता. कॅलिफोर्निया प्रकरणात सप्टेंबरमध्ये खटला चालवणार होता, ज्यामध्ये त्याच्यावर किमान १.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर कर चुकवल्याचा आरोप होता. त्याला करचुकवेगिरीच्या आरोपांसाठी १७ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि बंदुकीच्या आरोपांसाठी २५ वर्षांपर्यंत शिक्षा होणार होती. मात्र, आता बायडन यांच्या निर्णयानंतर त्याची शिक्षा माफ होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा