24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामापॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स

पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स

सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. काही दिवसांपूर्वीचं याप्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात अली होती. त्यानंतर राज कुंद्रा याला चौकशीसाठी बोलावले आहे.

माहितीनुसार, राज कुंद्रा (वय ४९ वर्षे) याला सोमवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयात त्याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील इतरांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मोबाईल ऍपद्वारे पोर्नोग्राफिक कंटेंटची निर्मिती आणि वितरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने राज कुंद्रा याच्या घरासह कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी छापे टाकले होते. मुंबई आणि उत्तर प्रदेशात १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. कथित पॉर्न प्रोडक्शनच्या संदर्भात २०२१ मध्ये कुंद्राविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या खटल्यातून ईडीची चौकशी सुरू आहे. राज कुंद्रा याला यापूर्वी जुलै २०२१ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक केली होती, नंतर त्याला शहर न्यायालयातून जामीन मिळाला. अडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या ऍपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रा याच्यावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

हे ही वाचा..

“बीएसएफचे जवान भारताचा सन्मान, महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी भक्कम ढाल म्हणून उभे”

भारतीय वंशाचे काश पटेल हे एफबीआयच्या संचालक पदी

कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन

‘न्यूज २४’ कडून भारताचा जीडीपी कमी झाल्याचा खोटा दावा

प्रकरण काय?

मॉडेल्स आणि अभिनेत्यांना चित्रपटातील भूमिकांचे आमिष दाखवून अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. मुंबईत भाड्याने घेतलेल्या बंगल्यात किंवा अपार्टमेंटमध्ये शूटींग केले जात होते. शूटिंग दरम्यान, अभिनेत्रींना वेगळ्या स्क्रिप्टनुसार काम करण्यास सांगितले जायचे आणि न्यूड सीन करण्यासाठी दबाव आणायचे. ज्यांनी नकार दिला त्यांना धमक्या दिल्या गेल्या. रेकॉर्ड केलेल्या क्लिप नंतर सबस्क्रिप्शन-आधारित ऍप्सवर अपलोड केल्या गेल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या रॅकेटमध्ये राज कुंद्राच्या कंपनीच्या मालकीच्या हॉटशॉट्स या ऍपचा सहभाग उघडकीस आणला.

जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान, राज कुंद्राच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की प्लॅटफॉर्मवर कोणता मजकूर अपलोड केला गेला हे ठरवण्यासाठी राज कुंद्रा किंवा त्याचे आयटी प्रमुख रायन थॉर्प हे दोघेही जबाबदार नाहीत. मात्र, मुंबई पोलिसांनी कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा