अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे साधारण जानेवारी माहिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेणार असून दरम्यान त्यानी त्यांची टीम बनवण्यास सुरुवात केली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली असून शनिवारी काश पटेल यांच्याकडे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) नेतृत्व सोपवण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ होते. तुलसी गब्बार्ड यांच्याकडे नॅशनल इंटेलिजन्सची जबाबदारी दिल्यानंतर आता पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनात संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत.
डोनाल्ड ड्रम्प यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, काश पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इंव्हेस्टीगेशनचे पुढील संचालक म्हणून काम करतील. शिवाय काश एक हुशार वकिल, इन्व्हेस्टीगेटर आणि ‘अमेरिका फर्स्ट’ फायटर आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भ्रष्टाचार उघड करणे, न्यायाचे रक्षण आणि अमेरिकन नागरिकांचे संरक्षण करणे अशी कामे केली आहेत. काश पटेल यांच्या नावाची घोषणा करत असतानाच ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या हिल्सबरो काउंटीचे शेरीफ चॅड क्रोनिस्टर यांची ड्रग एन्फोर्समेंट एजन्सीचे प्रमुख म्हणून नेमणूक केल्याची घोषणा देखील केली. पटेल यांच्या नावाची घोषणा ट्रम्प यांनी केली असली तरी त्याची निश्चिती ही रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखालील सिनेटने मंजूरी दिल्यानंतरच होणार आहे.
हे ही वाचा..
कॅनडाचे खलिस्तानी प्रेम; दहशतवादी अर्श डल्लाला मिळाला जामीन
‘न्यूज २४’ कडून भारताचा जीडीपी कमी झाल्याचा खोटा दावा
केरळातील कम्युनिस्ट पार्टी सांप्रदायिक शक्तींच्या नियंत्रणाखाली म्हणत माजी उपाध्यक्ष भाजपात
बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नसल्याचा कोलकातामधील रुग्णालयाचा निर्णय
२०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी व्रे यांची एफबीआयचे संचालक म्हणून १० वर्षांसाठी नियुक्ती केली होती. यानंतर आता काश पटेल के ख्रीस्तोफर व्रे यांची जागा घेणार आहेत. पटेल हे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या नेतृत्वाखाली काम करतील असेही ट्रम्प यांनी जाहीर केले.