2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे, त्याबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. बीसीसीआयने आयसीसीला स्पष्टपणे सांगितले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रिड मॉडेलवर करण्यात यावी, यावरून चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा होणार होती, ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून, शनिवारी (३० नोव्हेंबर) ऑनलाईन बैठक घेतली जाणार असल्याच सांगण्यात आलं आहे.
ट्विटर पोस्टद्वारे माहिती देताना माजी पाकिस्तानी क्रिकेटर रशीद लतीफ यांनी सांगितले की, आज होणारी आयसीसीची बैठक उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डासाठी (पीसीबी) ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे २०२५ चे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आयसीसी बोर्डाने शुक्रवारी ऑनलाइन बैठक बोलावली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानमधील खराब संबंधांमुळे भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.
हे हि वाचा:
काँग्रेसमध्ये संघाचे स्वयंसेवक किती?
वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला जीआर रद्द!
डॉ. हेडगेवारांच्या ‘स्वातंत्र्य’ दैनिकाची शतकपूर्ती!
दरम्यान जय शाह 1 डिसेंबरपासून ICC चा पदभार स्वीकारणार आहेत. तर जय शाह आणि मंडळाचे इतर सदस्य नवीन अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी हे प्रकरण सोडविण्याच्या बाजूने आहेत. शनिवारी या प्रकरणावर तोडगा न निघाल्यास जय शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रकरण निकाली काढण्यात येईल. जय शाह टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याच्या बाजूने नसतील यात शंका नाही, तसे झाल्यास हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरणार आहे.