सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत असून सायबर चोरटे लोकांना लुटण्यासाठी नव्याने शक्कल लढवताना दिसत आहेत. यात ओटीपी वापरून फसवणूक करण्यात येत असलेल्या घटना लक्षणीय असून यात वाढ होत आहे. अनेकवेळा ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये बनावट ओटीपीचा देखील वापर करत फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशातच आता लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून योग्य ती पावलं उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे ओटीपीसंदर्भात १ डिसेंबरपासून मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
देशातील दूरसंचार नियामक असलेल्या टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘ट्राय’ने १ तारखेपासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेसेबिलिटी रुल्स नावाने ओळखली जाणारी ही प्राणाली सायबर गुन्हे तसेच ऑनलाइन फसवणुकीला लगाम घालण्याच्या दुष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर मोबाईल युझर्सला इंटरनेट बँकिंग आणि आधार कार्डसंदर्भातील ‘ओटीपी’ मेसेज उशिरा प्राप्त होण्याची होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ओटीपी वगळता इतर मेसेज नियमितप्रमाणे डिलिव्हर होतील असं सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा :
शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!
संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!
भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!
हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!
हे नवे नियम आणि यंत्रणा १ नोव्हेंबरपासून लागू होणार होते. मात्र, कंपन्यांच्या विनंतीनुसार यासाठी ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी देत कंपन्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत तयार रहावे असं सांगत १ डिसेंबरपासून यंत्रणा कार्यन्वयित करण्याचा निर्णय ‘ट्राय’ने घेतला आहे. ट्रेसेबिलिटी यंत्रणेमध्ये नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात येणारे मेसेज नेमके कुठून येतात याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे. तांत्रिक दृष्ट्या ही यंत्रणा सदर मेसेज कुठून आले हे जाणून घेण्यासाठी फार सक्षम हवी, म्हणूनच कंपन्यांनी ही यंत्रणा उभी करण्यासाठी ‘ट्राय’कडून अतिरिक्त एक महिन्याचा वेळ मागून घेतला. रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहाकांबरोबरच देशात सेवा पुरवणाऱ्या सर्वांना हे नवे नियम बंधनकारक असणार आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.