26 C
Mumbai
Friday, November 29, 2024
घरविशेषगोंदिया- कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

गोंदिया- कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

२० ते २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती

Google News Follow

Related

विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर शिवशाही बस उलटण्याची घटना घडली असून या भीषण अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गोंदिया- कोहमारा मार्गावरील डव्वाजवळ ही घटना घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. यावेळी बसचा वेग जास्त असल्याची माहिती आहे. वेगात जात असतानाच अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फुट आडवी घासत गेली. यामुळे बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच जवळच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली. दरम्यान, बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या.

पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत जखमींची मदत केली. शिवाय अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथम जवळच्या गोरेगाव आणि सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात आणि तेथून काही गंभीर रुग्णांना इतरत्र तातडीने हलवण्यात आल्याचीही माहिती उपस्थितांनी दिली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमी आणि मृत प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

हे ही वाचा : 

शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!

संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!

भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!

हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!

दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया-कोहमारा मार्गावर डव्वा जवळ झालेल्या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडून घेतली आहे. तसेच प्रशासनाला त्वरित आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदतही जाहीर करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा