सबंध देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले. त्यात महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक १३२ आमदार निवडून आले. या निवडणुका राज्यातील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे समर्थक आशिष मेरखेड आणि सौ. श्रद्धा मेरखेड यांनी तब्बल २० फुट उंचीचा एक फ्लेक्स त्यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर लावलेला आहे. या फ्लेक्सवर फडणवीस यांचा उल्लेख ‘महाविजयाचे शिल्पकार’ असा करण्यात आला आहे. या फ्लेक्सची चर्चा नागपूरसह परिसरात होत आहे.
लोकसभा निवणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा निवणुकीत किती जागा महायुतीला मिळणार याबद्दल उत्सुकता होती. मात्र केवळ ४ महिन्यात राज्यातील वातावरण बदलवण्यात महायुतीला यश आले. यात प्रमुख भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी बजावली होती. निवडणूक प्रचारात राज्यात सर्वाधिक प्रचार सभा घेण्याचा विक्रम फडणवीस यांनी नोंदवला. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि अचूक नियोजनामुळे हे घवघवीत यश भाजप आणी महायुतीला मिळू शकले.
हेही वाचा..
“बांगलादेशातील हिंदूंना मृत्यूला सामोरं जावं लागतंय”
जामा मशिद परिसरात शुक्रवारच्या नमाजापूर्वी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी तैनात
या यशाबद्दल मेरखेड दाम्पत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी भला मोठा फ्लेक्स त्यांच्या घराबाहेर लावला आहे. मेरखेड यांनी यापूर्वी भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुखपद भूषवले आहे. फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहेत. भाजप आणि महायुतीला मिळालेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांनी आपल्या भावना अशा पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. या फ्लेक्सची चर्चा मात्र नागपूरसह राज्यात सर्वत्र होत आहे.