राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यात हिंदू शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने काल (२७ नोव्हेंबर) स्वीकारली आणि पक्षकारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. दिल्लीचे रहिवासी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी विविध पुराव्यांच्या आधारे अजमेर दर्ग्यात संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहेत. याच दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘देशातील प्रत्येक भूमीवर अधिकार हा हिंदूंचाच’ असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले, हिंदू राष्ट्रात प्रत्येक इंच जमीन ही हिंदूंची होती, आहे आणि राहणार. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, अजमेर येथील दर्ग्यावर शिवमंदिर असलाचा दावा हा न्यायलयाने मान्य केलेला आहे आणि त्या दिशेने चौकशी सुरु केलेली आहे. ही चांगली गोष्ट आहे. शेवटी जे हिंदूंचे होते ते हिंदूंनाच मिळाले पाहिजे. लवकरच या देशातील प्रत्येक भूमीवर अधिकार हा हिंदूंचाच असणार असा माझा विश्वास आहे, जय श्री राम, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी हरदयाल शारदा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत, अजमेरच्या दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा केला. या प्रकरणी काल न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने दावा मान्य करत दर्गा समिती, अल्पसंख्याक व्यवहार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.
हे ही वाचा :
ईव्हीएमच्या वापरापासून काँग्रेसनेच सर्वाधिक विजय मिळविले, तेव्हा आता लाज बाळगा!
ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!
‘बांगलादेश इस्कॉन’ने चिन्मय कृष्ण दास यांना नाकारले, म्हणाले, आमचा संबंध नाही!
संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश