भारतीय यंत्रणांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. लष्कर-ए-तैयबाचा मोठा आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सलमान रहमान खान याला इंटरपोलच्या माध्यमातून रवांडा येथून भारतात आणण्यात आले आहे. सीबीआयच्या मदतीने एनआयएच्या टीमने त्याला भारताला आणले आहे.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) २०२३ मध्ये दहशतवादी सलमान विरुद्ध शस्त्रास्त्र कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हेगारी कट रचणे, दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
लष्कर-ए-तैयबाचा (LeT) सदस्य असल्याने, त्याने बेंगळुरू शहरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके पुरवण्यात मदत केली होती. २०२३ मध्ये बेंगळुरू शहरातील हेब्बल पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा :
एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील
संभलमध्ये हिंसाचारादरम्यान अचानक मोठ्या संख्येने लोक शस्त्रे घेऊन कसे पोहचले?
दिल्लीत भीषण स्फोट, घटनास्थळी सापडला पांढरा पावडरसारखा पदार्थ!
एनआयएच्या विनंतीवरून, सीबीआयने २ ऑगस्ट २०२४ रोजी इंटरपोलकडून त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि वॉन्टेड सलमानवर नजर ठेवण्यासाठी सर्व देशांच्या कायदा अंमलबजावणी संस्थांना याची माहिती देण्यात आली होती. यानंतर इंटरपोल नॅशनल सेंट्रल ब्यूरो – किगालीच्या मदतीने रवांडातून त्याचे स्थान शोधण्यात आले. त्यानंतर एनआयएच्या टीमने २८ नोव्हेंबर रोजी त्याला भारतात आणले. सीबीआयने या महिन्यात प्रत्यार्पण केलेला हा तिसरा वाँटेड गुन्हेगार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी मुंबईत दंगल आणि स्फोटकांच्या गुन्ह्यात हवा असलेला बरकत अली खान याचे सौदी अरेबियातून प्रत्यार्पण करण्यात आले. सीबीआयने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्याविरुद्ध रेड नोटीस जारी केली होती. केरळमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या रायहान अरबीक्कलालरीक्कल याचाही सौदी अरेबियात माग काढण्यात आला. डिसेंबर २०२३ मध्ये जारी करण्यात आलेल्या रेड नोटीसनंतर १० नोव्हेंबर रोजी त्याला परत आणण्यात आले.