राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यात हिंदू शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) स्वीकारली आणि पक्षकारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे रहिवासी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी विविध पुराव्यांच्या आधारे अजमेर दर्ग्यात संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाची सुनावणी कालही झाली होती. आजही न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने दावा मान्य करत दर्गा समिती, अल्पसंख्याक व्यवहार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला.
फिर्यादी विष्णू गुप्ता यांनी हरदयाल शारदा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत, अजमेरच्या दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा केला. दरम्यान, या प्रकरणी आता पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.