देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ नाणी आणि टपाल तिकीट जारी केले. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संविधानावर आधारित दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तर, राष्ट्रपती मुर्मू यांनी संस्कृत आणि मैथिली भाषेत संविधानाचे प्रकाशन केले.
संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, संविधान हा देशासाठी सर्वात पवित्र ग्रंथ आहे. आजच्या दिवशी आपण भारतीय जनतेने संविधान स्वीकारले आणि आत्मसात केले. आपली राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने, मी संविधान सभेच्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीवर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या राज्यघटनेत सर्वसमावेशक विचाराची छाप सोडली.
संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढे म्हणाल्या की, संविधानाने प्रत्येकाला त्यांचे हक्क दिले आहेत आणि तोचं आपल्या लोकशाहीचा पाया आहे. नारी शक्ती वंदन कायद्याने एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. आज आघाडीची अर्थव्यवस्था असण्यासोबतच आपला देश विश्वबंधूची भूमिकाही बजावत आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने समाजातील सर्व घटकांच्या, विशेषतः दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत. गरिबांना स्वतःची घरे मिळत आहेत आणि देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित होत आहेत.
हे ही वाचा :
चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके
पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार
विधानसभा निवडणुकीत ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; १० वर्षांतील सर्वाधिक ३.५ कोटी रुपये जप्त
बांगलादेशात चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शन करणाऱ्या हिंदू समुदायावर अज्ञातांकडून हल्ला
राष्ट्रपती म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्व देशवासीयांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. असे उत्सव आपली एकात्मता मजबूत करतात आणि राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण एकत्र आहोत हे दाखवून देतात. संविधान सभेत सर्व प्रांत आणि प्रदेशांच्या प्रतिनिधीत्वामुळे अखिल भारतीय चेतना बळकट झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.