विधानसभा निवडणुकीत आपल्या उपोषणामुळे महायुती पार उद्ध्वस्त होईल हा मनोज जरांगेंचा होरा पार कोलमडला. भाजपाचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडून सुद्धा त्यांच्या नौटंकीचा प्रभाव पडला नाही. जातवाद्यांना कोलण्यासाठीच जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले. धर्मनिष्ठ मराठ्यांनी जरांगेंचा निर्विवाद पराभव केला. आता खरे तर जनतेने आपले थोबाड फोडले असे मान्य करून जरांगे यांनी घरातच गोधडी घेऊन आराम केला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. ते पुन्हा उपोषणाच्या तयारीला लागले आहेत. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर जरांगेंनी तोंड काळे केले पाहीजे. जर केले नाही तर ही जबाबदारी आता जनतेने पार पाडली पाहिजे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात जरांगेंचे सारखे तळ्यात मळ्यात सुरू होते. एकूणच रागरंग पाहून जरांगेंनी अखेरच्या काही दिवसात तोंड आवळले होते. तरीही त्यांचा कल स्पष्ट दिसत होता. छगन भुजबळ यांच्याविरोधात येवल्यात प्रचार करून जरांगेंनी आपण महायुतीच्या विरोधात असल्याचे संकेत समर्थकांना दिले होते. आता आपण फार दिवस जगत नाही, शरीर साथ देत नाही, अशी भावनिक भाषा वापरून पाहिली. परंतु कशा कशाचा उपयोग झाला नाही. लोकांनी ही नौटंकी नाकारली. महायुतीच्या सरकारसाठी लोकांनी मतदान केले. शरीर फार साथ देत नाही असे म्हणणारे जरांगे महायुतीचे सरकार येते असे दिसताच, पुन्हा उपोषणाच्या तयारीला लागले आहेत. भाजपाने गोड बोलून मराठ्यांची मते घेतली, असा दावा जरांगे करतायत. त्यांनी आता थोबाड आवरावे. कारण मराठ्यांनी जरांगेना विचारून मतदान केलेले नाही. किंबहुना त्यांना फाट्यावर मारून. त्यांचा राजकीय एजेंडा तुडवून महायुतीला मतदान केलेले आहे. मौलाना सज्जाद नोमानीच्या दावणीला मराठ्यांना बांधण्याच्या उचापतींचे मराठ्यांनी चोख उत्तर दिलेले आहे.
जात महत्वाची असेलही परंतु धर्म त्याही पेक्षा महत्वाचा आहे, हा स्पष्ट कौल मराठ्यांनी दिला. मराठ्यांनी भगव्याची झळाळी वाढवली. जरांगेंच्या हिरवट राजकारणाला मूठमाती दिली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात लोकांना शिसारी येईपर्यंत जरांगेंचा अपप्रचार सुरू होता. एका जातीच्या विरोधात ते सतत बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून ब्रिगेडी मानसिकतेचा दुर्गंध येत होता. या विखाराच्या विरोधात मराठा एकवटलेला दिसला. उदयन राजे, शिवेंद्रराजे, नारायण राणे, त्यांचे दोन्ही पुत्र, अजित पवार, आशिष शेलार, अमित साटम, राम कदम, राधाकृष्ण विखे पाटील, या तमाम मराठा नेत्यांनी जरांगेंचा अजेंडा नाकारला. त्यांची भूमिका जाहीरपणे खोडून काढले. त्यांना मुहतोड जबाब दिला.
हे ही वाचा:
पर्थचा अभेद्य किल्ला भेदला! भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय
‘दर्शन घे काकांचं, थोडक्यात वाचलास’
१३२ सीट, स्ट्राईक रेट ८९ टक्के, मुख्यमंत्री म्हणून भाजपचा चेहरा फडणवीसच!
संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल
निवडणुकीच्या आधीच हे स्पष्ट झाले होते, जरांगे हा पेरूच्या आशेने विठू विठू करणारा पोपट आहे. त्याच्यासाठी कथा-पटकथा लिहीणारे सलीम-जावेद अर्थात राजेश टोपे आणि रोहित पवारांचे निवडणुकीत मतदारांनी पार पोतेरे केले. राजेश
टोपे पराभूत झाले, रोहित पवार हरता हरता जिंकले. लोकांनी महाराष्ट्रात जातीय विखार निर्माण करण्याची शिक्षा त्यांना दिली. या संपूर्ण सिनेमाचे दिग्दर्शक, जरांगेना नाचवणारे मदारी, भावी पंतप्रधान पक्षाची वाताहात पाहात बसले आहेत.
अवघे दहा आमदार त्यांच्या हाती उरले आहेत. मराठा समाजाला जरांगेनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चिथावण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठ्यांनी ही चिथावणी अमान्य केली. सत्तेवर असताना सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारखे उपक्रम राबणाऱ्या, मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाच्या मागे मराठा
समाज उभा राहिला. हा केवळ जातीच्या राजकारणाचा पराभव नाही. हा जातीय विखाराचा पराभव आहे, हा जरांगेंच्या लुच्चेगिरीचा पराभव आहे. हा हिंदुत्वाचा विजय आहे.
अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीची, जाळपोळीची चौकशी करण्याची घोषणा महायुतीने केली होती. लोकप्रतिनिधींना घरासह जिवंत जाळण्याचे पाप ज्यांनी केले त्यांचा हिशोब महायुती सरकारने चुकता केला पाहिजे. कोणाचा तरी राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न केला, हिंदूंना विभाजित करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे पुठ्ठे सुजवण्याचे काम महायुती सरकारने केले पाहिजे. महाराष्ट्र पेटवणाऱ्यांना सजा झाली पाहिजे. मराठा समाजाने भक्कमपणे महायुतीची पाठराखण केली आहे. तेव्हा पुन्हा मराठ्यांचे नाव घेऊन जर कोण महाराष्ट्रात चिथावणी देत फिरणार असेल तर
सरकारने हा प्रयत्न ठेचून काढायला हवा. उपोषणाची भानगड पुन्हा उपस्थित केली तर जातीय तणाव वाढवल्याचा गुन्हा दाखल करून जरांगेची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. जेसीबीने फुल उधळण्यासाठी, खानावळींसाठी त्याला पैसे
पुरवणाऱ्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)