25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? फैसल्याची प्रतीक्षा

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? फैसल्याची प्रतीक्षा

निकालाच्या दुसऱ्या दिवशी चर्चेला उधाण

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री कोण याची चर्चा रंगली होती. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने या निवडणुकीत दणदणीत यश मिळविल्यानंतर मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यासाठी कोणताही निश्चित फॉर्म्युला नसल्याने प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहे. सरकार स्थापनेसाठी आता हालचाली सुरू असून २७ किंवा २८ तारखेला मुंबईत नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वानखेडे स्टेडियम किंवा शिवाजी पार्क मैदानामध्ये हा शपथविधी होईल असे म्हटले जात आहे.

सध्या भाजपाचे १३२ आमदार निवडून आल्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यावर कुणीही शिक्कामोर्तब केलेले नाही. अद्याप भाजपाचा गटनेता निवडण्यात आलेला नाही. तिकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मात्र त्या त्या पक्षांनी गटनेता म्हणून निवड केली आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे याचाही निर्णय व्हायचा आहे. अनेकांनी आपण मंत्री बनणार असल्याच्या बातम्या पसरविण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

‘१ लाख नव्या तरुणांना राजकारणात आणण्याचे लक्ष्य’

विधानसभा निवडणुकीचा निकाल राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी

पत्नीच्या हत्येप्रकरणी १२ वर्षांपासून फरार असलेल्या पतीला अटक

मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला!

एकनाथ शिंदे हे गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते त्यामुळे यावेळीही त्यांना मुख्यमंत्रीपद सोपविण्यात येईल असाही अंदाज आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करताना तब्बल ५७ आमदार निवडून आणले. त्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते हे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पाहात आहेत. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय हा एनडीएचे शीर्ष नेतृत्व करणार आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

गेल्या निवडणुकीनंतर युतीला कौल असतानाही मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह ही शिवसेना आपलीच असल्याचा दावा केल्यानंतर ते भाजपासोबत आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील असा पक्षातील अनेकांचा होरा आहे. मात्र फडणवीस यांना त्यावेळी उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले होते. आता भाजपाने ऐतिहासिक यश मिळविले असल्यामुळे आणि त्यांच्या या कामगिरीमुळे महायुतीला २३० जागांवर विजय मिळवता आले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा