ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. सुरवातीला श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा विक्रम मोडला गेला आणि ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
पंतच्या बोली दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शर्यत होती, त्याच दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने अचानक राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरले. आणि आरटीएम पेक्षा जास्त बोली लावून पंतला आपल्याकडे घेतले. अशाप्रकारे लखनौने ऋषभ पंतला २७ कोटींमध्ये विकत घेतले.
गेल्या वर्षी कोलकात्याला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरलाही आयपीएल २०२५ च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. ऋषभ पंत नंतर श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना संघाचे कर्णधारपद मिळू शकते, असे मानले जात आहे.
हे ही वाचा :
महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला!
निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल? जरांगे म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो!
आंध्र प्रदेशात बसची ऑटो रिक्षाला धडक बसून ७ जण ठार
वंदे भारत गाड्यांवर दगडफेक ; दोघांना अटक