सध्या देशात कोविडने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे काही लोकांच्या नोकऱ्या, उद्योगाची साधनं देखील बंद झाली आहेत. अशा वेळेस आपल्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास आपल्या विमा पॉलिसीचा कुटुंबीयांना मोठा आधार असतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही २०१५ मध्ये चालू केलेली योजना आहे, जी वार्षिक १२ रुपयांच्या प्रिमियमवर लाभधारकाला २ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण देते. इतर अपघात विमा योजनांच्या तुलनेत ही योजना अत्यंत स्वस्त आहे.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत जर एखाद्या अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाला, तर त्याचे कुटुंब आणि नामनिर्देशित व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर जर अपघातावेळी ती व्यक्ती अर्धवट अपंग असेल तर त्याला एक लाख रुपये दिले जातील. तर पूर्णपणे अपंग झाले तर त्याला दोन लाख रुपये पूर्ण दिले जातील.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील कोविड रुग्णवाढ ५० हजारांखाली
तृणमुलच्या नृशंसांचे कुत्र्याच्या पिल्लांना मारण्याचे घृणास्पद कृत्य
कुबड्यांवर चालणाऱ्यांची पश्चिम बंगालबाबत बोलण्याची औकात काय?
या पॉलिसीचा फायदा 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात. यात विमाधारकाच्या बँक खात्यातून दरवर्षी १२ रुपयांचा प्रिमियम वजा केला जाणार आहे. एखाद्यास ही पॉलिसी बंद करायची असेल तर त्याने स्वतःचे खाते ज्या बँकेत आहे, तिथे अर्ज देऊन ही पॉलिसी बंद करु शकतो.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी पॉलिसीधारकांचे सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे. बँक खात्यासह आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. अर्जाच्या योजनेचा फॉर्म भरून, तसेच आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, वयाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला याची छायाप्रती बनवून पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागतो. अधिक माहितीसाठी आपण https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.