राज्याच्या विधानसभा पार पडल्याअसून महायुतीने महाविकास आघडीच्या परभाव ऐतिहासिक विजय प्राप्त केला. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मालेगाव व्होट जिहाद फंडिंग प्रकरण समोर आले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. यानंतर पथकाने तपास सुरु केला आणि कारवाईला सुरुवात केली. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाल्याचे असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत म्हटले की, मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला आहे. आयकर, ED, पोलीस, बँकिंग विभाग तपास करीत आहेत. फंडिंग प्रकरणातील मुख्य सुत्रधार सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मदचा मालेगाव येथील बेनामी खात्यात देशविदेशातून कोट्यवधी रुपये आले आहेत. ८०० कोटी रुपये हवालाने सुरत अहमदाबाद मुंबई वळवण्यात आले, हा पैसा वोट जिहादसाठी वापरण्यात आला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्यआरोपी सिराज मोहम्मद हारुण मेमन याच्या बद्दल मोठी माहिती समोर आली होती. आरोपीचे दुबईमध्ये ५ बिझनेस फर्म/बँक खाती आणि भारताच्या बँक खात्यांसोबत १०० कोटींचे व्यवहार. तसेच आरोपीचा व्होट जिहाद सहकारी सलमान सलील मिर्झाला (एम के एंटरप्राइझ) ३७ कोटी ८८ लाख रुपये वितरीत केल्याचे समोर आले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली होती.
मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता ₹1000 कोटींचा झाला
आयकर, ED, पोलीस, बँकिंग विभाग तपास करीत आहेत
सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मदचा मालेगाव येथील बेनामी खात्यात देशविदेशातून कोट्यवधी रुपये आले. ₹800 कोटी हवालाने सुरत अहमदाबाद मुंबई वळवण्यात आले, हा पैसा वोट जिहादसाठी वापरण्यात आला pic.twitter.com/ZXhizlgxz4
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 24, 2024
हे ही वाचा :
मशिदीच्या सर्वेक्षणावरून यूपीच्या संभलमध्ये तणाव, दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या!
विकास, उत्तम प्रशासनाचा आणि परिवारवादाला मूठमाती देणारा हा विजय
महाराष्ट्रात त्सुनामी; महायुतीने केला मविआचा सुपडा साफ, भाजपाचे ऐतिहासिक यश
विनोद तावडेंवर आरोप करणाऱ्या हिंतेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूरचा सुपडा साफ!