राज्यात दारुण पराभव स्वीकारायला लागल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला खचून न जाण्याचा सल्ला दिला आहे. हा निकाल अनाकलनीय असल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली.
ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने आपण राज्यभर फिरलो. सभांना गर्दी होत होती. राज्यात महागाई आहे, शेतकऱ्यांच्या कर्जाचा विषय आहे, महिला असुरक्षित आहेत, सोयाबीनला भाव नाही अशी परिस्थिती असताना लोकांनी महायुतीला कसे मतदान केले ? हेच कळत नाही असे ते म्हणाले. तरीही राज्यातील जनतेने निराश होऊ नये. आम्ही जनतेसाठी लढत राहू. आता मात्र राज्यात अस्सल भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींची निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विकासाचा विजय’
जनतेचा कौल मान्य; अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”
अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी इतकी प्रामाणिकपणे वागली हे चुकले का ? ही लाट का उसळली हेच कळले नाही. जिंकून आलेल्या सगळ्याचे अभिनंदन करत असताना जी आश्वासने दिली त्याची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना काळात माझ ऐकणारा महाराष्ट्र आज माझ्याशी असा वागेल, यावर विश्वास बसत नाही. काहीतरी गडबड असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.