विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालांचे कल समोर येत असून सध्या तरी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. बहुमताचा आकडा महायुतीने पार केला असून महाविकास आघाडी अद्याप दोन अंकी आकड्यावर अडकलेली दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत कलांवर संताप व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकांतील कलानुसार महायुतीला सर्वाधिक जागा मिळताना पाहून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खदखद व्यक्त केली असून म्हटले आहे की, हा निकाल जनतेचा कौल नसून, हा निकाल लावून घेतलेला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. या निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा:
भाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!
नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्ही सहर्ष स्वीकार करू!
विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!
सुरवातीच्या कलानुसार २८८ पेकी महायुती २०१८ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. यानंतर संजय राऊत म्हणाले की, हा कौल कसा मानावा हा प्रश्न राज्यापुढे आहे. शरद पवार यांचे राज्यात वादळ असताना त्यांना दोन अंकीही जागा मिळताना दिसत नाहीत. हा जनतेचा कौल नाही, असे आम्ही मानायला तयार नाही. निवडणुकीत विजय- पराभव होत असतो, पण ७५ जागाही आम्हाला मिळताना दिसत नाहीत. हा निकाल लावून घेतलेला आहे. लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होऊ शकत नाही. लाडकी बहिणीमुळे हा निकाल असा लागला आहे, असे मला वाटत नाही. महाराष्ट्रातील निकालांवर गौतम अदानी यांचे लक्ष होते. अदानी यांचे अटक वॉरंट निघाल्यानंतर हे चित्र बदलले आहे, असं संजय राऊत म्हणाले.