विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार असून सर्व पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार की मविआला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्वांच्या नेत्यांची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडत आहे. विजयी होणाऱ्या अपक्षांना संपर्क करण्यासाठी भाजपकडून नेत्यांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, नितेश राणेंवर ही जबाबदारी दिल्याचे समजतेय. भूपेंद्र यादव, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड देखील बैठकीला उपस्थित आहेत.
दरम्यान, याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणूक झाल्यानंतर राज्यातले प्रमुख मंत्री फडणवीस हे राज्यातला आढावा घेत असतात, त्यामुळे कुठे कशी स्थिती आहे, काय करायला हवे, उद्याच्या परिस्थितीला-निकालाला कशाप्रकारे सामोरे जावे, पुढील वाटचाल कशी करायची, अशा अर्थाने बैठक न्हवती तर भेटणा होती, असे दरेकर म्हणाले.
हे ही वाचा :
दिल्लीत ट्रक प्रवेश रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
रेणुकास्वामी हत्या : अभिनेता दर्शनच्या कायदेशीर अडचणी वाढल्या
‘राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार यावं’
ज्ञानवापी प्रकरण: पुरातत्व सर्वेक्षणाच्या हिंदुंच्या याचिकेवर मुस्लिम पक्षाकडून मागवले उत्तर