हरियाणातील जुलाना, जिंद येथील आमदार आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण वेगळे आहे. यावेळी तिचे बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निवडणुकीच्या काळानंतर जुलाना मतदारसंघ आणि विधानसभेच्या अधिवेशनातही न दिसल्याने विनेश फोगटचे बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स व्हायरल झाले आहेत.
‘बेपत्ता आमदाराचा शोध’, असे पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. तसेच पोस्टरवर विनेश फोगटचा फोटो देखील लावण्यात आला आहे. ‘विधानसभेचे संपूर्ण अधिवेशन पार पडले, पण मॅडम दिसल्या नाहीत,’ असे पोस्टरमध्ये म्हटले आहे. हे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या संपूर्ण वादावर विनेशच्या पीएने प्रतिक्रिया दिली आहे.
विनेश फोगटशी तिच्या नंबरवर संपर्क साधला असता, त्यांचे पीए सोनू यांनी सांगितले की, विनेश फोगट यांना काँग्रेसने स्टार प्रचारक बनवले असून त्यांना निवडणूक ड्युटीवर नियुक्त केले आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्या विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. जुलाणा मतदारसंघाचे प्रश्न ठळकपणे मांडले जातील, असे त्यांच्या पीएने सांगितले. दरम्यान, विनेश फोगट यांच्या बेपत्ता झाल्याच्या पोस्टरची विरोधक खिल्ली उडवत आहेत.
हे ही वाचा :
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी चकमक, १० नक्षलवाद्यांचा खात्मा
क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; आयपीएलच्या पुढील तीन हंगामाच्या तारखा जाहीर?
अटक टाळण्यासाठी केला हॉटस्पॉटचा वापर
‘अनिल परबांच्या साई रिसोर्टला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार’